मुंबईतील जसलोक या खासगी रुग्णालयात लागोपाठ तीन दिवस दोन वेळा अवयवदान झाल्याने चार गरजू रुग्णांना नवी संजीवनी मिळाली. ४ मार्च रोजी ७० वर्षीय रुग्णाकडून मृत्यू पश्चात अवयदान झाल्याने यकृत आणि दोन मूत्रपिंडे दान करता आली, तर रविवारी ६ मार्चला ६९ वर्षीय महिलेने मृत्यू पश्चात यकृत दान केल्याने एका रुग्णाचा जीव वाचला. या दोन सलग अवयवदानानंतर मुंबईत यंदाच्या वर्षातील अवयवदानाचा आकडा आता ८ वर पोहोचला आहे.
( हेही वाचा : खुशखबर…दोन वर्षांत पहिल्यांदा कोरोना रुग्णांची संख्या कमी! )
अवयवदानाचा निर्णय
रविवारी जसलोक रुग्णालयात दाखल झालेल्या ६९ वर्षीय महिलेची रुग्णालयात दाखल करतानाच प्रकृती खूपच खालावली होती. या महिलेला पक्षाघाताच्या त्रासामुळे नजीकच्या रुग्णालयात अगोदर दाखल करण्यात आले होते. परंतु मेंदूत खूपच जास्त रक्तस्त्राव झाल्याने त्यांना तिथेच मेंदूमृत घोषित करण्यात आले. यावेळी रुग्ण महिलेच्या कुटूंबीयांनी आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सल्लयानुसार अवयवदानाचा निर्णय घेतला. मात्र खासगी रुग्णालयात अवयवदानाची नोंदणीकृत सुविधा नसल्याने कुटूंबीयांनी महिलेला जसलोक रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी जसलोक रुग्णालयातील डॉक्टरांनी संपूर्ण तपासणीअंती महिलेला मेंदू मृत घोषित केले. मात्र अतिरक्तस्त्रावामुळे महिलेकडून मृत्यूपश्चात मिळालेली दोन मूत्रपिंडे आणि डोळे अवदानासाठी निकामी ठरले. अखेर महिलेकडून यकृत गरजूला दिले गेले .
Join Our WhatsApp Community