Organic Waste Composting : सोसायट्यांच्या कचर्‍यापासून खतनिर्मिर्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज

135
Organic Waste Composting : सोसायट्यांच्या कचर्‍यापासून खतनिर्मिर्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज
Organic Waste Composting : सोसायट्यांच्या कचर्‍यापासून खतनिर्मिर्तीसाठी अत्याधुनिक यंत्रणा सज्ज

भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता सोसायटीतील कचर्‍याची सोसायटीनेच विल्हेवाट लावावी असे स्थानिक स्वराज्य संस्थांना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता बहुतेक सोसायट्यांनीच स्वतःचे कचरा संकलन केंद्र सुरू केले असून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एमरॉल्ड सोसायटीत अत्याधुनिक खतनिर्मिती यंत्रणा बसविण्यात आली आहे. दररोज 1 टन खतनिर्मिती या प्रकल्पातून केली जात असून हे खत सोसायट्यांनी कुंड्यांमध्ये वापरले जात आहे. घोडबंदरातील गोदरेज एमरॉल्ड या सोसायटीने हा प्रकल्प खरेदी करून पर्यावरणाचा होणारा र्‍हास थांबविण्यासाठी एक सकारात्मक पाउल टाकले आहे. हा प्रकल्प अमालगुस या कंपनीतर्फे हाताळला जात असून या योजनेचा आजुबाजूच्या इतर सोसायट्यांनी लाभ होवू शकतो, असा विश्वास गोउदरेज एरॉल्डच्या रहिवाशांनी व्यक्त केला आहे. (Organic Waste Composting)

(हेही वाचा- Advocate Academy : नवी मुंबईत होणार देशातील पहिली ॲडवोकेट अकॅडमी आणि संशोधन केंद्र)

ठाण्यातील गोदरेज एमरॉल्ड सोसायटीमध्ये नुकताच कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्प बसविण्यात आले आहे. गोदरेज एमरॉल्ड सोसायटीचे अध्यक्ष दादासाहेब गवळी, सचिव योगेश चौधरी, खजिनदार तेजींदर वाही यांच्या प्रयत्नामुळे सोसायटीतील कचर्‍याची विल्हेवाट लावून त्यापासून खतनिर्मिती करता यावी यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यानुसार अक्षय कोळी यांच्या अमालगुस कंपनीमार्फत कचर्‍यापासून खत निर्मिती यंत्रणेत कर्मचारी यंत्रणा राबवून हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या मार्गी लावला आहे. (Organic Waste Composting)

भारत सरकारच्या स्वच्छता अभियानात आपल्या सोसायटीने सहभागी व्हावे या हेतूने पर्यावरणाच्या रक्षणासाठी सोसायटीतील कचरा संकलित करून त्यापासून खत तयार करून तो सोसायटीतीलच झाडांना वापरण्यात यावा यासाठी अमालगूस या कंपनीच्या माध्यमातून अत्याधुनिक यंत्रणेवर देखरेख करण्यात येत आहे. तिचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. या कचर्‍यापासून खतनिर्मिती प्रकल्पात दिवसाला 1 टन कचरा संकलित करून त्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पावर काम करणारे कामगार अगदी सेफ्टी उपकरणे वापरून कचर्‍यातून प्लास्टिक आणि इतर अनावश्यक घटक वेगळे करून खत प्रकल्पासाठी आवश्यक असणार्‍या वस्तुंचा समावेश करून ही प्रक्रिया पार पाडत असतात. (Organic Waste Composting)

(हेही वाचा- Uday Samant : उद्योगमंत्र्यांना वैमानिकाने दिला नकार; समृद्धी महामार्गावरून केला प्रवास)

या खत प्रकल्पात तयार झालेले खत हे सोसायटीव्यतिरिक्त ठाणे महानगरपालिकेच्या वतीने रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या झाडांनाही हे खत पुरविण्यात येते. ठाण्यात इतर सोसायट्यांनीही हा प्रकल्प आपापल्या सोसायटीत सुरू केल्यास कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न सुटून शहराच्या बाहेर निर्माण होणारे डम्पिंग ग्राउंडवरील ताण कमी होवून हे कचर्‍यापासून तयार होणारे खत आपल्याच परिसरातील झाडांची निगा राखून त्यांची सर्वोत्तम वाढ होण्यास मदत करतील, असा आशावाद अमालगुस या कंपनीचे व्यवस्थापक अक्षय कोळी यांनी व्यक्त केला आहे. (Organic Waste Composting)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.