स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने Kargil Victory Day निमित्त’गाथा पराक्रमाची’ कार्यक्रमाचे आयोजन

211
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने Kargil Victory Day निमित्त'गाथा पराक्रमाची' कार्यक्रमाचे आयोजन
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने Kargil Victory Day निमित्त'गाथा पराक्रमाची' कार्यक्रमाचे आयोजन

कारगिल युद्धाचे यंदा २५ वे वर्ष आहे. त्या निमित्ताने सेना दलांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्याचे स्मरण करण्यासाठी २७ जुलै रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन (Hemant Mahajan) हे प्रमुख वक्ते असणार आहेत. (Kargil Victory Day)

(हेही वाचा- School Bus Accident: बेळगावात विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूलबस उलटली; सहा विद्यार्थी गंभीर जखमी)

या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. शनिवार, २७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता स्मारकातील मादाम कामा सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. देशप्रेमींनी सेनादलांविषयी आदर व्यक्त करणाऱ्या या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Kargil Victory Day)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.