महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी आणि के. सी. काॅलेजचा हिंदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार, १० फेब्रुवारी रोजी के. सी. महाविद्यालयातील मल्टी मीडिया रुम येथे दिवसभर विविध विषयांवर परिसंवादाचे (Seminar) आयोजन करण्यात आले आहे.
उद्घाटन सत्राचे मुख्य अतिथी माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्र
सकाळी १० वाजता उद्घाटन सत्र पार पडणार आहे. यावेळी मुख्य अतिथी माजी राज्यमंत्री अमरजीत मिश्र उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता आयोजित प्रथम सत्रात अध्यक्षस्थानी के. जे. सोमैय्या विश्वविद्यालयाचे माजी प्राचार्य सतीश पांड्ये असणार आहेत. तर नवभारत टाईम्सचे वरिष्ठ पत्रकार सचिंद्र त्रिपाठी मुख्य अतिथी आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित, ज्येष्ठ पत्रकार राकेश त्रिवेदी, ज्येष्ठ पत्रकार प्रसाद काथे, ज्येष्ठ पत्रकार सुनील कुमार सिंद, युनूस खान आदी विचार मांडणार आहेत.
द्वीतीय सत्राचे मुख्य अतिथी ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर
दुपारी २ वाजता द्वीतीय सत्राच्या (Seminar) अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विमल मिश्र असणार आहेत. तर मुख्य अतिथी ‘हिंदुस्थान पोस्ट’चे संपादक स्वप्नील सावरकर असणार आहेत. तर एमएमपी शाह महाविद्यालयाचे माजी हिंदी विभागध्यक्ष उषा मिश्र, बिर्ला महाविद्यालयाचे सह प्राध्यापक श्यामसुंदर पांडे, वरिष्ठ फिल्म पत्रकार पराग छापेकर भाषण करणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता आयोजित समारोप (Seminar) सत्रात महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष शीतला दुबे, के. जे. सोमैय्या विश्वविद्यालयाचे माजी प्राचार्य सतीश पांड्ये, के. जे. सोमैय्या विश्वविद्यालयाचे उप प्राचार्य स्मरजीत पाधी आदी उपस्थित राहणार आहेत.
Join Our WhatsApp Community