भ्रष्टाचार रोखण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान Vigilance Awareness Week चे आयोजन

95
भ्रष्टाचार रोखण्यासाठी 28 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान Vigilance Awareness Week चे आयोजन

भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृती उपक्रम राबविले जातात. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीसाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. केंद्रीय दक्षता आयोगाने जाहीर केल्यानुसार 28 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताह करीता यावर्षी सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्र समृद्धी ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. सप्ताहाचा प्रारंभ येत्या 28 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता भ्रष्टाचार निर्मुलनाच्या प्रतिज्ञेने होणार आहे. (Vigilance Awareness Week)

(हेही वाचा – Mahim Assembly Constituency मधून उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास सरवणकर आणि सावंत यांचा असाही फायदा!)

कुणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना, भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, 91, सर पोचखानवाला मार्ग, वरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064, दूरध्वनी क्रमांक 022-24921212, अथवा संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in, ईमेल [email protected], addlcpacbmumbai @mahapolice.in, फेसबुक www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप acbmaharashtra.net, ट्विटर – @ACB_Maharashtra आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संदीप दिवाण, अपर पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी केले आहे. (Vigilance Awareness Week)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.