स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी)ने त्यांच्या 32 व्या स्थापना दिवशी आणि आझादीच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बीकेसी कार्यालयाचे उद्घाटन केले आहे. मुंबईत ‘स्वावलंबन मेळाव्या’चे आयोजन करण्यात आले आहे. 02 एप्रिल 2022 पासून 4 दिवस हा मेळावा चालणार आहे. हा मेळावा सूक्ष्म-उद्योजकांना, विशेषत: महिला आणि कारागीरांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची आणि विक्री करण्याची संधी देणार आहेत.
सूक्ष्म उद्योजकांना सक्षम बनविण्यावर भर
अशा कार्यक्रमांमध्ये सूक्ष्म उद्योजक / कारागीर / स्वयंसहाय्यता गटांना सक्षम बनविण्यावर भर दिला जातो, जेणेकरून ते त्यांचा ग्राहकवर्ग वाढवू शकतील. स्वावलंबन मेळ्याचे उद्घाटन सिडबीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिवसुब्रमण्यम रमण यांच्या हस्ते झाले. रमन यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की, सिडबीच्या मिशन स्वावलंबन अभियानांतर्गत कारागीर आणि महिला उद्योजकांना त्यांचे व्यवसाय शाश्वत करून स्वावलंबी होण्यासाठी मदत मिळते या मेळ्यामुळे हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होणार आहे.
(हेही वाचा – बेस्टच्या आगारात अधिकार्यांची मनमानी; ऐकूनच घेई ना कोणी!)
उद्योगांना योग्य निधी मिळणार
एंटरप्राइजेसच्या संवर्धन आणि विकासाव्यतिरिक्त, हा कार्यक्रम अशा उद्योगांना योग्य निधी सहाय्याद्वारे पुढे जाण्यास मदत करणारा ठरणार आहे.
Join Our WhatsApp Community