टेबल टेनिस स्पर्धेत ‘बेस्ट’ हॅट्रीक

144

बेस्ट ही संपूर्ण मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. बेस्टमध्ये सद्यस्थितीला हजारो कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी बेस्ट उपक्रमाकडून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. बेस्ट कला आणि क्रीडा मंडळांतर्फे बेस्टमध्ये या स्पर्धांचे आयोजन केले जाते.

( हेही वाचा : महागाई भत्ता तर मिळाला; राज्य सरकारी कर्मचारी म्हणतात जुन्या पेन्शनचे काय? )

बेस्टच्या माहिती तंत्रज्ञान विभागाची गरुड झेप

क्रीडा विभागातील टेबल टेनिस स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा बेस्टच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या नितीन वालावलकर यांनी पहिला क्रमांक पटकावत हॅट्रीक केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बेस्टच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने क्रीडा क्षेत्रात गरुड झेप घेतली आहे. या स्पर्धांमध्ये बेस्टचे प्रशासकीय, वाहतूक, विद्युत पुरवठा, इमारत विभाग देखील सहभागी झाले होते. टेबल टेनिस स्पर्धत दोन वर्षांच्या पदार्पणातच निलेश जानवलेकर यांना उप विजेतेपद मिळाले आहे. या विजेत्यांचे सर्व बेस्ट कामगार व अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.