-
मुंबई विशेष प्रतिनिधी
राज्याचे गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या निर्देशानुसार सर्वसामान्य नागरिकांना सवलतीच्या दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (Mhada) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत, म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ११४ वसाहतीमधील ३४ वसाहतींमध्ये “आपला दवाखाना” ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म्हाडा मुंबई मंडळाने मॅजिक डील हेल्थ फॉर ऑल या खाजगी संस्थेच्या वन रूपी क्लिनिक सोबत सामंजस्य करार (MOU) केला आहे. हा करार आज वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात आला. याप्रसंगी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर , मंडळाच्या सहमुख्य अधिकारी वंदना सूर्यवंशी, म्हाडाचे उप मुख्य अधिकारी अनिल वानखेडे (Anil Wankhede) तसेच वन रूपी क्लिनिक चे डॉ. राहूल घुले, डॉ.अमोल घुले आणि डॉ. मोहन नागरगोजे इत्यादि उपस्थित होते.
(हेही वाचा – IPL 2025, RCB vs GT : बंगळुरूचा हंगामातील पहिला पराभव, गुजरातने ८ गडी राखून हरवलं)
या योजनेच्या माध्यमातून संबंधित वसाहतींतील नागरिकांना परवडणाऱ्या दरात आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्यात येणार आहेत.जसे वैद्यकीय तपासणी करिता नागरिकांकडून नाममात्र १ रुपया शुल्क आकारले जाणार आहे. तसेच इतर वैद्यकीय तपासण्या जसे रक्त तपासणी, रक्तातील साखरेचे प्रमाण तपासणी सारख्या सुविधा केवळ १० रुपयांमध्ये केल्या जाणार आहेत.
या योजनेअंतर्गत म्हाडातर्फे (Mhada) वन रूपी क्लिनिक संस्थेला म्हाडा वसाहतींच्या आवारात दवाखाना सुरू करण्यासाठी ४०० चौरस फुटांची जागा उपलब्ध करवून दिली जाणार आहे. या सुविधेचा फायदा म्हाडा (Mhada) वसाहतीतील नागरिकांव्यतिरिक्त सर्व सामान्य नागरिकांना देखील घेता येणार आहे.
आपला दवाखाना म्हाडाच्या कुलाबा कफ परेड, चेंबूर, पंतनगर – घाटकोपर, कन्नमवार विक्रोळी, महावीर नगर कांदिवली, प्रतिक्षा नगर, सायन, अंटोप हिल-वडाळा, आदर्श नगर-ओशिवरा, सांताक्रूझ अंधेरी, वांद्रे , जुहू, कुर्ला, मानखुर्द , माहीम, कांदिवली, बोरीवली येथील विविध म्हाडा वसाहतींमधून उभारण्यात येणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community