राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. मागील २४ तासांत ५ हजारांहून अधिक नवे रुग्ण सापडले आहे. विशेष म्हणजे यात ‘डेल्टा प्लस’ या भीषण विषाणूचा समावेश आहे, ही चिंतेची बाब बनली आहे. डेल्टा प्लसचा तब्बल २४ जिल्ह्यांना विळखा बसला आहे, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
(हेही वाचा : १६ हजार वीरांगणांच्या बलिदानाला ७१८ वर्षे पूर्ण! राणी पद्मिनीच्या पराक्रमाचे व्हावे स्मरण!)
डेल्टा प्लेसची रुग्ण संख्या १०३ वर पोहचली!
सोमवारी नव्याने २७ डेल्टा प्लसबाधित रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या १०३ झाली आहे. आता एकूण २४ जिल्ह्य़ांमध्ये याचा प्रादुर्भाव असल्याचे चाचण्यांमधून उघड झाले आहे. यात ५० टक्के रुग्ण हे विदर्भ आणि कोकण विभागात आढळले आहेत. ‘रत्नागिरी जिल्ह्य़ातील सर्वाधिक १५ रुग्ण हे संगमेश्वर तालुक्यात आढळले आहेत. परंतु या भागात संसर्गाचा प्रसार वाढल्याचे किंवा एकाच ठिकाणी रुग्णसंख्या वाढलेली आढळलेले नाही. कोकण विभागात बाधितांचे प्रमाण जास्त सिंधुदुर्ग आणि चिपळूणमध्ये होते. रत्नागिरीतील बाधितांचे प्रमाण तर आता दोन टक्क्यांच्याही खाली आले आहे. तर जळगावमध्ये १३ रुग्ण हे विविध ठिकाणी आढळले आहेत. हे रुग्ण जूनमध्ये बाधित झाले होते. यांच्या संपर्कातीलही फारसे बाधित झाल्याचे दिसून आलेले नाही, अशी माहिती आहे.
या जिल्ह्यांना ‘डेल्टा प्लस’चा विळखा!
जळगाव (१३), रत्नागिरी (१५), मुंबई (११), कोल्हापूर (७), ठाणे, पुणे, अमरावती, गडचिरोली प्रत्येकी सहा, नागपूर (५), अहमदनगर (४), पालघर, रायगड, अमरावती प्रत्येकी तीन, नांदेड, गोंदिया, सिंधुदुर्ग, नाशिक प्रत्येकी दोन, चंद्रपूर, अकोला, सांगली, नंदुरबार, औरंगाबाद, बीड, भंडारा प्रत्येकी एक.
Join Our WhatsApp Community