Western Railway Updates: ओव्हर हेड वायर तुटली, वाणगाव-डहाणूदरम्यान लोकल रद्द, गाड्या ४० ते ४५ मिनिटं उशिरानं

उपनगरीय सेवांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे.

111
Western Railway Updates: ओव्हर हेड वायर तुटली, वाणगाव-डहाणूदरम्यान लोकल रद्द, गाड्या ४० ते ४५ मिनिटं उशिरानं
Western Railway Updates: ओव्हर हेड वायर तुटली, वाणगाव-डहाणूदरम्यान लोकल रद्द, गाड्या ४० ते ४५ मिनिटं उशिरानं

पश्चिम रेल्वेच्या (Western Railway) डहाणू-वानगाव स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं पश्चिम रेल्वेचा खोळंबा झाला असल्याची घटना बुधवारी (१ नोव्हेंबर) सकाळी घडली आहे. तसेच, याचा परिणाम उपनगरीय सेवांबरोबरच लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या दुरुस्तीचं काम झालं असल्याची माहिती मिळत असून तरीदेखील गाड्या ४० ते ४५ मिनिटं उशिरानं धावत आहेत.  (Western Railway Updates)

दरम्यान, डहाणूला डाऊन लाईनच्या ओव्हरहेड वायर तुटल्यानं वाणगाव ते डहाणू दरम्यान संध्याकाळपर्यंत लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या लोकल केळवेरोड, पालघर, बोईसर किंवा वाणगाव येथून सोडण्यात येणार आहेत. बोईसर- दिवा ही गाडी रद्द करण्यात आली आहे. उमरोळी स्थानकात कुठलीही पॅसेंजर थांबत नसल्यानं, उमरोळी स्थानकात वलसाड गाडीचा थांबा द्यावा, ही विनंती करण्यात आली होती, ती प्रशासनाकडून मान्य करण्यात आली आहे.

(हेही वाचा : Maratha Reservation : मराठा समाजाचे आंदोलन तीव्र ,परभणी बंदची हाक)

या गाड्यांच्या वेळांवर परिणाम 
22953 MMCT-ADI मुंबई सेंट्रल येथून ०७:४० वाजता सुटेल
12009 MMCT-ADI मुंबई सेंट्रल येथून ०७:२० वाजता सुटेल
22196 BDTS-VGLJ दादर येथून ०६:३०वाजता निघेल

पश्चिम रेल्वेवर २०४ लोकल फेऱ्या पूर्ववत
पश्चिम रेल्वेनं खार ते गोरेगाव दरम्यानच्या सहाव्या रेल्वे मार्गाच्या बांधकामांसाठी २९ दिवसांच्या सुरू असेल्या मेगाब्लॉकमुळे सोमवारपासून ते शुक्रवारपर्यत दिवसाला ३१६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचे पुरते हाल झाले आहे. तसेच, रेल्वे स्थानकांवरील गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची कोंडी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने बुधवार रद्द करण्यात आलेल्या ३१६लोकल फेऱ्यापैकी ११२ ट्रेन पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.