P. L. Deshpande Maharashtra Kala Academy च्या नूतनीकृत संकुलाचे उद्घाटन २ मार्चला

35
P. L. Deshpande Maharashtra Kala Academy च्या नूतनीकृत संकुलाचे उद्घाटन २ मार्चला
  • प्रतिनिधी

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ २८ फेब्रुवारी ऐवजी २ मार्च रोजी होणार आहे. हा समारंभ रविवारी सकाळी साडे अकरा वाजता रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे पार पडणार आहे.

(हेही वाचा – Marathi Bhasha Din च्या निमित्ताने ‘गुणीजनां’नी जागवल्या वीर सावरकरांच्या आठवणी)

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नूतनीकृत संकुलाचे (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) लोकार्पण करण्यात येईल. तसेच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार अनिल देसाई आणि आमदार महेश सावंत आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती आणि विशेष कार्यक्रम

नूतनीकृत संकुलाच्या (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) उद्घाटनाच्या निमित्ताने नाट्य, चित्रपट, चित्रकला आणि शिल्पकला क्षेत्रातील नामवंत कलाकार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावेळी संस्कृती विभागाच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

(हेही वाचा – Heatwave : राज्यात फेब्रुवारीमध्येच उष्णतेची लाट ! IMD चा अंदाज काय?)

संपन्न होणार एक ऐतिहासिक सोहळा

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy) हे राज्याचे एक महत्त्वाचे सांस्कृतिक केंद्र असून त्याच्या नूतनीकरणानंतर नव्या रूपात ते कलाकारांसाठी अधिक सुविधा देणारे ठरणार आहे. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.