P. L. Deshpande Maharashtra Kala Academy मधील नवीन दृकश्राव्य संकुलाचे “स्वरगंधर्व सुधीर फडके” नामकरण

60
P. L. Deshpande Maharashtra Kala Academy मधील नवीन दृकश्राव्य संकुलाचे "स्वरगंधर्व सुधीर फडके" नामकरण
  • प्रतिनिधी

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या नूतनीकृत संकुलात नव्याने साकारण्यात आलेल्या ध्वनीमुद्रण व ध्वनिरोपण कक्ष, आभासी चित्रीकरण कक्ष, संकलन कक्ष आणि प्रशिक्षण दालन या संकुलाचे नामकरण “स्वरगंधर्व सुधीर फडके दृक-श्राव्य संकुल” असे करण्यात आले आहे. बुधवार, ९ एप्रिल २०२५ रोजी संगीतकार श्रीधर फडके यांच्या हस्ते या संकुलाचे लोकार्पण झाले. सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy)

(हेही वाचा – नौदलाने Rafale खरेदीसाठी ६४ हजार कोटींची डील)

या कार्यक्रमाला सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, अकादमीच्या संचालिका मिनल जोगळेकर, दिग्दर्शक कुमार सोहनी, पुरुषोत्तम बेर्डे, गायिका उत्तरा केळकर, राणी वर्मा, उपेंद्र भट यांच्यासह कला क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुधीर फडके यांच्या अजरामर गीतांचा कार्यक्रम सादर झाला. श्रीधर फडके यांनी स्वतः बापूजींनी संगीतबद्ध केलेले गाणे गायले, तर केतकी भावे जोशी, अभिषेक नलावडे, सोनाली कर्णिक, प्रशांत लळीत, कुणाल रेगे आणि अजित परब यांनी निवडक गाणी सादर करून वातावरण भारावून टाकले. (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy)

(हेही वाचा – Mumbai आंतरराष्ट्रीय विमानतळावर अकासा कंपनीच्या विमानावर मधमाशांनी केला हल्ला)

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले, “सुधीर फडके यांच्या स्मृती जपण्याचे काम शासनाने केले याचा आनंद आहे. संकुलाला नाव देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. त्यांनीच सुधीर फडके यांचे नाव सुचवले आणि हा निर्णय घेतला गेला. हे संकुल सर्वांसाठी कमी शुल्कात खुले असेल.” त्यांनी मराठी शाळांमधील आपल्या अनुभवाचा उल्लेख करत, “आम्ही बापूजींची गाणी प्रार्थना म्हणून गायलो. आज मराठीसाठी आंदोलन करणाऱ्यांची किती मुले मराठी शाळेत शिकतात, हे माहिती नाही,” असा टोलाही लगावला. कार्यक्रमात विकास खारगे यांनी सादर केलेले बासरी वादन विशेष आकर्षण ठरले. हे संकुल मराठी कला आणि संगीत क्षेत्राला नवी दिशा देणारे ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (P. L. Deshpande Maharashtra Kala Academy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.