प्रभा अत्रेंना पद्मविभूषण, तर पद्म पुरस्काराने सन्मानित होणार महाराष्ट्रातील 10 रत्ने!

बुधवारी 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभरात पाहायला मिळणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला 2022 वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने पद्मविभूषण पुरस्कारासाठी 4 नावं घोषित केली आहेत. त्यातील पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये मरणोत्तर माजी सीडीएस जनरल बिपीन रावत, तसेच भाजपाचे दिवंगत नेते कल्याण सिंह, राधेश्याम खेमा तर महाराष्ट्रातील प्रभा अत्रे यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

महाराष्ट्रात 10 पद्म पुरस्कार

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्रातील 10 रत्नं पद्म पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यात सर्वोच्च असा पद्मविभूषण पुरस्कार प्रभा अत्रे यांना घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर नारायण चंद्रशेखर, सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. त्याचसोबत महाराष्ट्रातील खालील मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे.

( हेही वाचा: पद्म पुरस्काराची घोषणा : सीडीएस बिपीन रावत, कल्याण सिंह यांच्यासह चौघांना पद्म विभूषण..वाचा संपूर्ण यादी )

पद्मश्री पुरस्काराचे मानकरी

  • डाॅ. हेमंतराव बावस्कर (आरोग्य)
  • सुलोचना चव्हाण (कला)
  • डाॅ. विजयकुमार डोंगरे (आरोग्य)
  • सोनू निगम (कला)
  • अनिल कुमार रघुवंशी (सायन्य आणि इंजिनिअरिंग)
  • डाॅ. भीमसेन सिंघल (आरोग्य)
  • डाॅ. बालाजी तांबे (आयुर्वेद)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here