झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण, महाराष्ट्रातील तिघांना पद्मभूषण, तर ८ जणांना पद्मश्री पुरस्कार

७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारकडून पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पदमश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये झाकीर हुसेन यांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उद्योग क्षेत्रात कुमार मंगलम बिर्ला यांना, विज्ञान क्षेत्रात दीपक धार आणि कला विभागासाठी सुमन कल्याणपूर यांना पद्मभूषण पुरस्कारासह महाराष्ट्रातील  ८ जणांना पदमश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पद्म पुरस्कार हा भिकू इदाते (सामाजिक कार्य), राकेश झुनझुनवाला (उद्योग), परशुराम खुणे (कला), प्रभाकर मोंदे (साहित्य), गजानन माने (सामाजिक कार्य), रमेश पतंगे (शिक्षण), रविना टंडन (कला) आणि कोमी वाडिया (कला) यांना जाहीर झाले आहेत. देशभरात एकूण ६ जणांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, तर पद्मभूषण ९ जणांना आणि पद्मश्री पुरस्कार ९१ जणांना जाहीर करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here