पाकिस्तानातील महत्त्वाची शहरे बुडाली अंधारात; आर्थिक दिवाळखोरीचा परिणाम

126

पाकिस्तान सध्या आर्थिक दिवाळखोरीतून जात आहे. पाकिस्तानला सावरण्यासाठी कोणताही पर्याय दिसत नाही, एका बाजूला पाकिस्तानातील जनता एका भाकरीसाठी मारामारी करत असताना आता पाकिस्तानातील महत्त्वाची शहरे काळोखात बुडाली आहेत. त्यामुळे पाकिस्तानात अंधार पसरला आहे. पाकिस्तानातील कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा आणि पाकिस्तानातील इतर प्रमुख शहरे अंधारात बुडाली आहेत.

नागरिकांमध्ये तीव्र नाराजी 

वीज केंद्र चालवण्यासाठी पाकिस्तानकडे पैसा राहिला नाही. परिणामी पाकिस्तानच्या महत्वाच्या शहरांमध्ये वीज संकटामुळे अंधार पसरला आहे. आधीच राजकीय आणि आर्थिक संकटांशी झगडत असलेला आर्थिक दिवाळखोरीत गेलेल्या पाकिस्तानमध्ये सोमवारी, २३ जानेवारी रोजी ट्रान्समिशन लाईन्समध्ये बिघाड झाल्यामुळे अनेक शहरांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे. ऊर्जा संकटाचा सामना करणाऱ्या या शेजारील देशात गेल्या चार महिन्यांत ही वीज खंडित होणारी दुसरी मोठी घटना घडली आहे. पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयाने सकाळी ट्वीट केले आहे. देशातील मोठ्या भागातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे या देशातील नागरिकांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे. पाकिस्तानच्या या परिस्थितीवर मोठ्या प्रमाणात मीम्स तयार केले जात आहेत आणि ते व्हायरल केले जात आहेत.

(हेही वाचा चमत्कारांच्या दिखाव्यातून हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती पाद्र्यांना अंनिसवाल्यांचा विरोध का नाही? – श्री महंत सुधीरदास महाराज यांचा सवाल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.