Pakistan : कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन चिनी नागरिकांचा मृत्यू

179
Pakistan : कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन चिनी नागरिकांचा मृत्यू
Pakistan : कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन चिनी नागरिकांचा मृत्यू

अमेरिकी नागरिकांनी पाकिस्तानात (Pakistan) सावध रहावे; म्हणून अमेरिकेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. इस्रायल-इराण युद्ध झाले, तर त्याचे पडसाद आपल्या नागरिकांवर उमटण्याची शक्यता असल्याने अमेरिकेने ही अ‍ॅडवायझरी जारी केली होती. या मार्गदर्शक सूचना प्रसारित झाल्यानंतर लगेचच कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट घडविण्यात आला आहे. यात दोन चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अनेक भागात स्फोटाचा आवाज ऐकू आला.

(हेही वाचा – Aditya Thackeray : मित्र कोण आणि शत्रू कोण?)

गेल्या महिन्यातच चीनने पाकिस्तानला आपले सैन्य तैनात करण्यासाठी दबावाखाली आणले होते. चिनी नागरिकांवर हल्ले होत असल्याने पाकिस्तानमधील प्रकल्पांवर कामाला असलेल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी चीन आपले सैन्य तैनात करणार आहे. चिनी नागरिकांना बलुचिस्तानी संघटना लक्ष्य करत आहेत. रविवार, ६ ऑक्टोबर रोजी झालेला हल्लादेखील याचाच एक भाग होता.

चीनचे प्रकल्प होते लक्ष्य

या हल्ल्यात अनेक पाकिस्तानी कर्मचारी मारले गेले आहेत. एकूण मृत्यूंची संख्या स्पष्ट झालेली नाही. या वेळी सिंध प्रांतातील वीज निर्मिती प्रकल्पावर काम करत असलेल्या चिनी इंजिनिअरच्या ताफ्यावर बॉम्ब फेकण्यात आले. बलुचिस्तान नॅशनल आर्मी या संघटनेने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. कराची विमानतळावरून येणारे चीनी अभियंते आणि गुंतवणूकदारांच्या उच्चस्तरीय ताफ्याला लक्ष्य करण्यात आले. अभियंते चीन-अनुदानित पोर्ट कासिम पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेडचे ​​कर्मचारी होते. हा प्लांट चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा (China-Pakistan Economic Corridor) एक भाग आहे, असे या संघटनेने म्हटले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.