नागपूरमध्ये NIA ने धाड टाकली असून गुरूवारी पहाटे चार वाजल्यापासून चौकशी सुरू करण्यात आली आहे. नागपूरमध्ये दोघांचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले असून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
( हेही वाचा : मोठी बातमी! राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा! सुरत न्यायालयाचा निर्णय)
जमात ए रजा मुस्तफा या संघटनेच्या माध्यमातून देश विघातक कृत्य?
‘गुलाम मुस्तफा’ ही ‘जमात ए रजा मुस्तफा’ या संघटनेच्या माध्यमातून काहीतरी देश विघातक कारवाई करत असल्याची माहिती NIA कडे होती. त्यासंदर्भात अधिक तपास करण्यासाठी NIA चे पथक नागपूरात दाखल झाले. याच बडी मशीद परिसरात अहमद रझा वल्द मोह आणि अख्तर रझा वल्द मोह यांची चौकशी NIA केली आहे.
या छाप्यादरम्यान नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी-कर्मचारी देखील हजर होते. कोणचाही अनुचित प्रकार घडू नये साठी परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. बडी मशीद परिसरात अहमद रझा वल्द मोह आणि अख्तर रझा वल्द मोह यांनी पाकिस्तानातील काही व्यक्तींशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चॅट केल्याच्या प्रकरणातून पहाटे चार वाजता त्यांच्या घरी जाऊन एनआयच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.
Join Our WhatsApp CommunityNational Investigation Agency (NIA) has conducted searches at three locations in Nagpur in its ongoing probe into a case having terror links. pic.twitter.com/VCJJWCrpBu
— ANI (@ANI) March 23, 2023