ढाक्यातील पाकिस्तानचे दूतावास (Pakistan Embassy) हे धर्मांधांचे केंद्र बनले आहे. बांगलादेशातील शेख हसीना सरकार पडल्यानंतर देशभरात हिंदूंविरुद्ध झालेल्या हिंसाचाराच्या ३ हजारांवरील घटनांचे कट याच दूतावासात रचले गेले. जमात-ए-इस्लामी(Jamaat-e-Islami), खिलाफत मजलीस या धर्मांध संघटनांच्या प्रतिनिधींसह पाकिस्तान दूतावासात (Pakistan Embassy) बैठकांचे सत्र सुरुच आहे.
( हेही वाचा : अयोध्येतील Shree Ram Mandir चा कळस सोन्याने झळाळणार)
मोहम्मद युनूस हे हंगामी पंतप्रधान आहेत, एक चेहरा आहेत. मात्र साऱ्या चाली कट्टरतावादी धर्मांध संघटना आणि पाकिस्तान मिळून खेळत आहे. बांगलादेश पूर्ववत पाकिस्तानच्या रंगात न्हाऊन निघालेला आहे. तसेच भारत- बांगलादेश मैत्रीचे प्रतिके असलेली स्मारके उद्धवस्त करण्यात आली आहेत. त्याचबरोबर बांगलादेशने (Bangladesh) पाकिस्तानातून (Pakistan) २५ हजार टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. कराचीहून चितगावला जानेवारीत ही साखर पोहचेल. गेल्या ५३ वर्षात पहिल्यादांच असे चित्र घडत आहे. त्यामुळे युनूस (Muhammad Yunus) यांचे हंगामी सरकार सत्तेच्या लालसेत लष्कर मुल्ला युतीचे बाहुले बनले आहे. त्यांनी दहशवादी, जिहादी संघटनांवरील बंदी उठवली आहे. (Pakistan Embassy)
दरम्यान पाकिस्तान समर्थक खालिदा झिया (Khaleda Zia) यांच्या बीएनपी या पक्षाने भारतीय साड्या जाळून आपल्या भारतविरोधी भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. सर्व प्रकारच्या भारतीय वस्तुंवर बांगलादेशींना बहिष्कार घालावा म्हणून अनेक ढाका, चितगावसह शहरात निदर्शने सुरु आहेत. (Pakistan Embassy)
हेही पाहा :