पाकिस्तानातील (Pakistan) पेशावरमध्ये, ५६ वर्षीय हिंदू (Hindu) स्वच्छता कर्मचारी नदीम नाथ (Nadeem) याची इस्लाम स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणात, मुश्ताक नावाच्या एका इस्लामिक कट्टरपंथीला अटक करण्यात आली आहे, ज्याने नदीमच्या हत्येची कबुली दिली आहे. (Pakistan)
( हेही वाचा : गोंधळलेले Raj Thackeray; महापालिका निवडणुकीआधी मनसेची दिशाहीनता कायम)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. २९ मार्च रोजी नदीम (Nadeem) पेशावर पोस्टल कॉलनीमध्ये काम संपवून घरी परतत असताना मुश्ताक (Mushtaq) नावाच्या व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला. गोळी लागताच नदीम जमिनीवर पडला आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु रुग्णालयात जाण्याआधीच नदीमचा मृत्यू झाला.
नदीमचा भाऊ सागर नाथ (Sagar Nath) याने एफआयआरमध्ये सांगितले आहे की, मुश्ताक गेल्या २-३ महिन्यांपासून नदीमवर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणत होता. नदीमने प्रत्येक वेळी नकार दिला, पण इस्लामी कट्टरतेसमोर तो काहीही करू शकला नाही. सागर म्हणाला, “मुश्ताकने (Mushtaq) माझ्या भावाच्या डोक्यात गोळी झाडली. तो आम्हाला इशारा देत असे की जर आम्ही धर्मांतर केले नाही तर तो आम्हाला मारून टाकेल.” नदीमच्या मित्रांनीही कुटुंबाला सांगितले की तो कोणाच्या तरी त्रासामुळे अस्वस्थ आहे. पण घरात मोठा असल्याने त्यांने कुटुंबातील सदस्यांना काहीही सांगितले नाही. एका कष्टाळू माणसाला फक्त हिंदू असल्यामुळे आपला जीव गमवावा लागला. (Pakistan)
पोलिसांनी दावा केला की, भाना मारी पोलिस स्टेशनचे एसएचओ अजमल हयात (Ajmal Hayat) यांच्या पथकाने २४ तासांच्या आत मुश्ताकला चारसद्दा येथून अटक केली. एसएचओ म्हणाले, “त्याने गुन्हा कबूल केला आहे, तपास सुरू आहे.” पण प्रश्न असा आहे की, एका धर्मांध व्यक्तीच्या अटकेने हिंदूंचे दु:ख कमी होईल का? त्यामुळे पाकिस्तान सरकार दहशतवादाने आणि आर्थिक कोंडीने ग्रस्त आहे. अशातच अल्पसंख्यांकांच्या हिताचे संरक्षण करण्यास पाकिस्तान सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे.
पाकिस्तान (Pakistan) सरकार दहशतवाद (Terrorism) आणि गरिबीशी झुंजत आहे, परंतु अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तिथे धर्मांध इस्लामी हिंदूंवर (Hindu) अत्याचार करत आहेत. जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. तिथला इस्लामी कट्टरता हिंदूंना गिळंकृत करत आहे. जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार सामान्य आहेत, दरवर्षी शेकडो हिंदू मुलींचे अपहरण केले जाते आणि त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले जाते. हिंदूंवरील (Hindu) अत्याचार, मंदिरांची तोडफोड आणि जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारणे हे सरास सुरु आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community