धक्कादायक: शिक्षकाकडून पाकिस्तान जिंदाबादची घोषणा, शाळेतून केली हकालपट्टी

82

भारतात सर्वत्र 15 ऑगस्ट दिवशी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच, कोल्हापुरात मात्र एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानसोबत आपले संबंध तणावपूर्ण असतात. त्या पार्श्वभूमीवर देशातही अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवले आहेत. असाच प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात घडला आहे. मोबाईलवर पाकिस्तान जिंदाबाद असा स्टेटस लावलेल्या एका शिक्षकावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, त्याची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. सध्या त्या शिक्षकाला  पोलिसांनी ताब्यात घेतले असून, तो शिक्षक जम्मूचा असल्याचे सांगण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील अतिग्रे येथे राहणा-या जावेद अहमद या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची कसून चौकी करण्यात येत आहे.

( हेही वाचा: अकोला प्रिटींग प्रेस चालवणा-या ज्येष्ठ पत्रकाराची आत्महत्या; म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी …’ )

चौकशीसाठी शिक्षक पोलिसांच्या ताब्यात हातकणंगले तालुक्यातील एका खासगी शाळेत हा शिक्षक नोकरी करत होता. मात्र 14 ऑगस्ट रोजी जावेद अहमदने आपल्या मोबाईलमध्ये व्हाट्सअॅपला पाकिस्तान जिंदाबादचा स्टेटस ठेवला होता. जावेद अहमद याचा स्टेटस शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिल्यानंतर शिक्षकाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

5 ऑगस्टला ब्लॅक डे स्टेटस

जावेद अहमद याने याआधीही आपल्या मोबाईमध्ये 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीर ब्लॅक डे असा स्टेटस ठेवला होता. त्यावेळी त्यांच्या शिक्षकांच्या ग्रुपमधील अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. त्यामुळे पोलिसांनी आता जावेद अहमदला ताब्यात घेऊन कसून चौकशीला सुरुवात केली असून, शाळेतून मात्र त्याची हकालपट्टी केली आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.