पाकिस्तानाच्या (Pakistan) पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्ह्यात एका मंदिराचे मशिदीत रूपांतर (Temple Convert Into Mosque) करण्यात आले आहे. त्यात हद्द म्हणजे या मंदिराला बाबरी मशीद (Babari Mosque) असे नावही देण्यात आला आहे.
( हेही वाचा : Thane News : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; नातेवाईक आक्रमक)
हा संपूर्ण प्रकार माखन राम जयपाल या पाकिस्तानी यूट्यूबरने (Pakistani YouTuber) उघडकीस आणला. या स्थळाला भेट देऊन व्हिडिओ फुटेजच्या माध्यमातून जयपाल याने हे सत्य उघडकीस आणले आहे. ज्यावेळी जयपाल व्हिडिओ फुटेज घेण्यासाठी मंदिरात गेला तेव्हा तिथल्या काही जुन्या जाणत्या लोकांनी ही आधी गुरुद्वारा असल्याचे सांगितले.
मात्र यूट्यूबरने स्वत: मंदिराचे नीट निरीक्षण केल्यावर हे जुने मंदिर असल्याचे त्याच्या लक्षात आला. मंदिराचा एक घुमट अद्याप शिल्लक आहे. ज्यावर ‘ऊँ’ असे स्पष्टपणे लिहण्यात आले आहे. मात्र याच घुमटावर भोंगे बांधण्यात आले असून त्यातून अजान ऐकू येते. याविषयी एका व्यक्तीशी जयपाल बोलला, तेव्हा त्या व्यक्तीने हे पूर्वी मंदिर असल्याचे सांगितले. ज्याचे आता मशिदीत रुपांतर (Temple Convert Into Mosque) झालेले आहे.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community