उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीमध्ये एका पाकिस्तानी (Pakistani) महिलेने शिक्षण विभागाची फसवणूक केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे ९ वर्ष सरकारी शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षिका म्हणून तिने काम केले. पाकिस्तानी शिक्षिकेचे नाव शुमायला खान असे असून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण फतेहपूर पश्चिम पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडले.
( हेही वाचा : मालेगाव प्रकरणी Kirit Somaiya आक्रमक; ‘बोगस जन्म दाखले घेणाऱ्या 110 जणांची यादी पोलिसांना दिली’)
बनावट कागदपत्रांचा आधार घेत सहाय्यक शिक्षिकेची नोकरी मिळवणाऱ्या पाकिस्तानी (Pakistani) महिलेविरुद्ध एफआरआय दाखल करण्यात आली आहे. शुमायला खान (Shumaila Khan) हिने बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे प्राथमिक शिक्षण विभागमध्ये शासकीय शाळा माधापूरमध्ये सहाय्यक शिक्षिकेची नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. (Pakistani)
शुमायला खानने (Shumaila Khan) माधोपूरमधील (Madhopur) प्राथमिक शाळेमध्ये ९ वर्षे शिक्षिका म्हणून कार्यरीत होती. तिने सदर केलेले रहिवासी प्रमाणापत्र हे बनावट असल्याचे आता निष्पन्न झाले आहे. शुमायला खानचे आई-वडील पाकिस्तानी नागरिक असल्याचे तक्रारीची चौकशी करणाऱ्या स्थानिक गुप्तचर युनिट पथकाला आढळून आले. संबंधित बनावट कागदपत्र हे उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालयातून जारी करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आता उपजिल्हा दंडाधिकारी कार्यालयानेही शुमायला पाकिस्तानी महिला असल्याचे सांगितली. (Pakistani)
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, उपजिल्हा दंडाधिकारी यांनी रामपूर (Rampur) यांच्या अहवालामध्ये शुमायला खानने चुकीची माहिती देऊन रहिवासी प्रमाणपत्र दिले होते. मात्र याप्रकरणाचा खुलासा होताच प्रमाणपत्र बनावट कागदपत्र रद्द करण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शुमायला खानला दि. ३ ऑक्टोबर २०१४ रोजी निलंबित केले आहे. फतेहगंज पोलिसांनी संबंधित पाकिस्तानी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. (Pakistani)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community