सावधान! तुम्ही ‘या’ देशातून शिक्षण घेताय? मग तुम्हाला मिळणार नाही नोकरी

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) शिक्षणासाठीच्या आपल्या मार्गदर्शन सूचना जाहीर केल्या आहेत. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानमधील शिक्षणाची पदवी अवैध आहे. तेथील उच्च शिक्षणाची पदवी भारतात ग्राह्य धरली जाणार नाही. त्याामुळे शिक्षण घेणा-यांनी पाकिस्तानात जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानमधून शिक्षण घेतले असल्यास त्यांना भारतात पुढील शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

…तर चीनमधील शिक्षणही ग्राह्य धरले जाणार नाही

दरम्यान विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने काही दिवसांपूर्वी चीनबाबतही या प्रकारचा निर्णय घेतला होता. चीनमधील विद्यापीठांतून केवळ ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केलेली पदवी भारतात ग्राह्य धरली जाणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता पाकिस्तानमधील सर्वच अभ्यासक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र या अटींमधून स्थलांतरीतांना वगळले आहे. स्थलांतरित नागरिकांनी भारताचे नागरिकत्व मिळवले असल्यास त्यांना भारतात नोकरी मिळू शकते असे त्यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा: संजय राऊत म्हणतात, आता कारागृहात बसून वाचा हनुमान चालीसा )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here