Palghar Election Marathon: मतदारांच्या जनजागृतीसाठी मॅरेथॉनचे आयोजन, नियम आणि अटी काय आहेत? जाणून घ्या

233
Palghar Election Marathon: मतदारांच्या जनजागृतीसाठी मॅरेथॉनचे आयोजन, नियम आणि अटी काय आहेत? जाणून घ्या

मतदारांच्या जनजागृतीसाठी ५ मे रोजी सकाळी ६ वाजता विविध वयोगटांतील नागरिकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉनचे आयोजन SVEEP (Systematic Voter’s Education and Electoral Participation)अंतर्गत करण्यात आले आहे. (Palghar Election Marathon)

भारत निवडणूक आयोगाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 हा कार्यक्रम घोषित झालेला आहे. त्यानुषगाने पालघर जिल्हातील मतदारांमध्ये जनजागृती करून मतदानासाठी प्रवृत्त करणे आयोगाकडील याविषयी स्थायी सूचना आदेशांची अंमलबजावणी करणे व नागरिकांमध्ये निवडणुकीविषयी जनजागृती करण्यासाठी SVEEP (Systematic Voters Education Program) जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर मोहिम राबविण्यात येत आहेत.

पालघर जिल्हयातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीकोणातून दिनांक 05/05/2024 रोजी जिल्हाधिकारी, गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली, नोडल अधिकारी SVEEP आणि जिल्हा क्रिडा अधिकारी, सुहास व्हनमाने यांच्या सन्वयाद्वारे विविध वयोगटातील सर्वसामान्य नागरीकांसाठी “Run For Vote” मॅरेथॉन कार्यक्रमाचे खालीलप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.

मॅरेथॉन सहभाग  
पालघर जिल्ह्यातील विविध वयोगटातील महिला / पुरुष, शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्व आस्थापनांवरील शासकीय / निमशासकीय / खाजगी नोकरीतीली अधिकारी / कर्मचारी आणि पालघर व परिसरातील कोणताही इच्छुक व्यक्ती व सर्वसामान्य नागरीक “Run For Vote” मॅरेथॉन मध्ये सहभाग नोंदवू शकतो.

सहभागी होण्यासाठी नियम व अटी  
“Run For Vote” मॅरेथॉन मध्ये कोणत्याही वयोगटील स्त्री / पुरुष सहभागी होऊ शकतात, 3 कि.मी., 5 कि.मी., 10 कि.मी अशा विविध मॅरेथॉनपैकी कोणत्याही एकाच प्रकारच्या मॅरेथॉन मध्ये भाग घेता येईल.

3 KM Fun Run – Male & Female = Under 16 Years Age Group

17 to 45 Years Age Group

Above 45 Years Age Group

5 KM – Run – Male & Female = Under 16 Years Age Group

17 to 45 Years Age Group

Above 45 Years Age Group

10 KM – Run – Male & Female = Under 16 Years Age Group

17 to 45 Years Age Group

Above 45 Years Age Group

1. मॅरेथॉनसाठी सर्व भाग घेतलेल्या धावपटूंनी दिनांक 05 मे, 2024 रोजी सकाळी ठिक 06:00 वाजता पाचबत्ती हुतात्मा स्तंभ, पालघर येथे उपस्थित रहावे.

2. मॅरेथॉन पूर्ण करणा-या प्रत्येक सहभागी व्यक्तीस “Unique Finisher Medal” व प्रमाणपत्र देण्यात येईल.

3. मॅरेथॉन मधील प्रत्येक धावपट्टूला आकर्शक टी-शर्ट देण्यात येईल.

4. मॅरेथॉनचा मार्ग पुढीलप्रमाणे असेल :-

i) 3 KM (Fun Run) = सुरुवात पाचबत्ती हुतात्मा स्तंभ ते स्वातंत्र्य वीर सावरकर चौक (वळण नाका) व पुन्हा परतीची मॅरेथॉन – स्वातंत्र्य वीर सावरकर चौक (वळण नाका) ते पाचबत्ती हुतात्मा स्तंभ येथे संपेल.

ii) 5 KM = सुरुवात पाचबत्ती हुतात्मा स्तंभ ते स्वातंत्र्य वीर सावरकर चौक (वळण नाका) ते डॉ.आंबेडकर चौक ते नविन सातपाटी मार्ग ते पाचबत्ती हुतात्मा स्तंभ येथे संपेल.

iii) 10 KM = सुरुवात पाचबत्ती हुतात्मा स्तंभ ते स्वातंत्र्य वीर सावरकर चौक (वळण नाका) ते डॉ.आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (माहिम-पालघर मार्ग) ते देविशा मार्ग ते पाचबत्ती हुतात्मा स्तंभ येथे संपेल.

5. 3 / 5 / 10 किमी धावणे मॅरेथॉन बक्षिसे  

a. प्रथम पारितोषिक – ट्रॉफी

b. द्वितीय पारितोषिक – ट्रॉफी

c. तृतीय पारितोषिक – ट्रॉफी

6. रेस सपोर्ट आणि न्युट्रीशन पोषण :-

a. योग्य हायड्रेशन पौष्टिक पेय दिले जाईल.

b. अत्यावश्यक परिस्थितीमध्ये प्राथमिक वैद्यकीय सहाय्य पुरविले जाईल.

c. सर्व धावपटूंना धावल्यानंतर नाश्ता दिला जाईल.

d. फक्त वैध BIBs (Time Tracking) असलेल्या धावपटूंनाच नाश्ता दिला जाईल.

e. सर्व सपोर्ट स्टेशन्स आणि स्वयंसेवकांना दिलेल्या कटऑफ वेळेनंतर बाजुला केले जाईल.

f. पार्किंग जागा उपलब्ध नसल्याने, नियोजीत स्थळी पोहण्यासाठी आपण आपल्या स्तरावर प्रवासाचे नियोजन करावे.

मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंकमध्ये माहिती भरावी किंवा सोबत दिलेल्या QR CODE स्कॅन करून माहिती भरावी.

https://www.townscript.com/e/run-for-vote-232303-palghar

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.