Palm Oil : अकरा राज्यांमध्ये ‘इतक्या’ हेक्टरवर पाम तेल वृक्षांची लागवड, खाद्यतेल वाढवण्यावर भर

'मेगा ऑयल पाम प्लांटेशन ड्राईव्ह' मुळे खाद्यतेल उत्पादनात भारत 'आत्मनिर्भर' होण्यास मदत मिळणार आहे

202
Palm Oil : अकरा राज्यांमध्ये 'इतक्या' हेक्टरवर पाम तेल वृक्षांची लागवड, खाद्यतेल वाढवण्यावर भर
Palm Oil : अकरा राज्यांमध्ये 'इतक्या' हेक्टरवर पाम तेल वृक्षांची लागवड, खाद्यतेल वाढवण्यावर भर

राष्ट्रीय खाद्यतेल मिशन-ऑईल पाम अंतर्गत ११ राज्यातील ४९ जिल्ह्यांमध्ये पाम तेल वृक्षांची लागवड करण्याची मोहिम राबवली गेली. दरम्यान, कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी सुमारे ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ५ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. ‘मेगा ऑयल पाम प्लांटेशन ड्राईव्ह’ सुरु केल्यामुळे खाद्यतेल उत्पादनात भारत ‘आत्मनिर्भर’ होण्यास मदत मिळणार आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात २५ जुलै २०२३ रोजी झाली होती. २०२५-२६ पर्यंत ६.५ लाख हेक्टर क्षेत्रावर पाम तेल वृक्षांची लागवड करण्याचे उद्दीष्ट आहे. ११ राज्यांमधील ४९ जिल्ह्यांतील ७७ गावांमधील ७ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी पाच लाखांहून अधिक पाम तेलाच्या वृक्षांची लागवड केली आहे.

या ११ राज्यांमध्ये होणार पाम तेल वृक्षांची लागवड –

कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, कर्नाटक, मिझोराम, नागालँड, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि त्रिपुरा या प्रमुख पाम तेल उत्पादक राज्यांमध्ये पाम वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना वृक्ष लागवडीबद्दल अधिक जागरुक करणे, वृक्षांचे आरोग्य सुधारणे हे वेळोवेळी होणाऱ्या वृक्ष लागवडीच्या चर्चासत्रांचे उद्दीष्ट होते.

(हेही वाचा – Gavati Chaha Leaves : पावसाच्या दिवसांत चहात ‘हा’ पदार्थ टाकून पहा)

इंडोनेशिया आणि मलेशियातून भारतात पाम तेलाची आयात –

इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमधून भारतात पाम तेलाची ९० टक्के आयात करण्यात येते. पाम तेल रोजच्या जवळजवळ प्रत्येक पदार्थांत आढळते. डिझेल आणि पेट्रोलमध्ये पाम तेलाचा बायोइंधन म्हणून वापर करतात. तसेच, खाद्यपदार्थ, चॉकलेट, आईसक्रीम, ब्रेड, बटर अगदी सौंदर्यप्रसाधनांमध्येही पाम तेलाचा वापर केला जातो.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.