पॅन-आधार लिंकसाठी उरला एकच दिवस, नाहीतर भरावा लागणार दंड!

116

तुम्ही तुमचे पॅनकार्ड आधार कार्डशी लिंक केले आहे का? नसेल केले तर ते आताच करा. कारण आज (31 मार्च) पॅन-आधार लिंकसाठी शेवटचा दिवस असणार आहे. 1 एप्रिलपासून पॅन-आधार लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे. 31 मार्चनंतरही आधार-पॅन लिंक करता येईल, मात्र त्यासाठी तुम्हाला दंड जमा करावा लागणार आहे. पहिल्या तीन महिन्यांसाठी 500 रुपये दंड निश्चित करण्यात आला आहे. तर, लिंक केल्यानंतर, तुम्हाला 1000 रुपये भरावे लागतील. यासाठी सीबीडीटीने अधिसूचना जारी केली आहे.

आयकर कायद्याच्या कलम 1961 च्या कलम 139AA नुसार, नागरिकांना त्यांचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे, अन्यथा त्यांची अनेक आर्थिक कामे ठप्प होऊ शकतात. यामध्ये नवीन डेबिट/क्रेडिट कार्डच्या वापरातही अडथळा येऊ शकतो. यामध्ये 50 हजार रुपयांपेक्षा जास्त FD मिळवण्यामधील समस्येचा देखील समावेश आहे. मात्र काही क्षेत्रातील व्यक्तींना या नियमातून सूट देण्यात आली आहे. यासंदर्भात इन्कम टॅक्स इंडियाने ट्विट केले आहे.

असे करा पॅन-आधार लिंक

  • तुम्हाला https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar ला भेट द्यावी लागेल.
  • पॅन, आधार क्रमांक, आधारवार नाव आणि मोबाइल नंबर यासारखे तपशील भरा.
  • हे तपशील भरल्यानंतर, “Link Aadhaar” वर क्लिक करा.
  • तुम्ही कोणत्याही मोबाईल नंबरद्वारे तुमचा पॅन आधारशी लिंक करू शकता.
  • तुम्हाला 56677 – UIDPAN वर एसएमएस पाठवावा लागेल.

अशी जाणून घ्या पॅन आधार लिंक स्थिती

  • तुम्हाला या लिंकला भेट द्यावी लागेल – https://www.pan.utiitsl.com/panaadhaarlink/forms/pan.html/panaadhaar
  • तुम्हाला पॅन नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा टाकावा लागेल.
  • त्यानंतर शेवटी सबमिट वर क्लिक करा.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.