यंदाही पंचगंगा आणि स्वप्नाक्षय मित्र मंडळ महापालिकेच्या गणेश गौरव स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये

92

मागील पाच ते सहा वर्षांपासून पहिल्या तीन गणेशोत्सवांमध्ये स्थान मिळवणाऱ्या लोअर परळमधील पंचगंगा आणि अंधेरी सात बंगला येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळांनी याही वर्षी मुंबई महापालिकेच्या श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेत पहिल्या तीनमध्येच स्थान मिळवले आहे. लोअर परळ मधील पंचगंगा गणेशोत्सव मंडळांने पहिला तर अंधेरीतील स्वप्नाक्षय मित्र मंडळाने तिसरा क्रमांक पटकावला. तर दुसरा क्रमांक मालाड मालवणीतील युवक उत्कर्ष मंडळाने पटकावला आहे.

महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यामार्फत आयोजित केलेल्या सन – २०२२ च्या ‘श्रीगणेश गौरव पुरस्कार’ स्पर्धेचा निकाल महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी गुरुवारी जाहीर केला. पालिका मुख्यालयातील नवीन विस्तारित इमारतीच्या दुस-या मजल्यावरील परिषद सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान हा निकाल जाहीर करण्यात आला. याप्रसंगी उप आयुक्‍त (परिमंडळ – २) तथा गणेशोत्‍सव समन्‍वयक रमाकांत बिरादार उपस्थित होते. या स्पर्धेचे पहिले पारितोषिक हे ना. म. जोशी मार्गावरील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ यांना घोषित करण्यात आले. या गणेश मंडळाद्वारे ‘सुगम्य भारत’ या संकल्पनेवर आधारित जनजागृतीपर देखावा उभारण्यात आला होता. ज्यामध्ये प्रामुख्याने दिव्यांग व्यक्तिंना सार्वजनिक जीवनात वावरताना येणा-या अडचणी व त्यावरील उपाययोजना या संबंधित बाबींचा समावेश आहे. याच स्पर्धेचे द्वितीय पारितोषिक मालावणी – मालाड (पश्चिम) येथील युवक उत्कर्ष मंडळास घोषित करण्यात आले. या मंडळाने आपत्कालीन व्यवस्थापन व उपाययोजना या विषयीचा प्रत्ययकारी देखावा उभारुन जनजागृती साधली आहे. तर तिसरा पुरस्कार हा सात बंगला, अंधेरी (पश्चिम) परिसरातील स्वप्नाक्षय मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव यांना जाहीर करण्यात आला. या मंडळाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील देखावा उभारला आहे.

या तिनही गणेश मंडळांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आवाहनानुसार पर्यावरणपूरक श्रीगणेश मूर्तिंची स्थापना करण्यासोबतच पर्यावरणपूरक बाबींचा वापर करुन देखावे उभारले आहेत. तसेच यंदाची शाडू मातीची सर्वोत्कृष्ट श्रीगणेश मूर्ती कांजूरमार्ग येथील शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास घोषित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचे पारितोषिक हे विक्रोळी (पश्चिम) परिसरातील बालमित्र कला मंडळ यांच्या श्रीगणेश मूर्तिसाठी, तर सर्वोत्कृष्ट नेपथ्यकाराचे पारितोषिक हे घाटकोपर (पूर्व) परिसरातील रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ यांना घोषित करण्यात आले. या व्यतिरिक्त विविध गटांमधील ८ पारितोषिकांचीही घोषणा गुरुवारी करण्यात आली. तसेच या स्पर्धेत सहभागी झालेल्या २० गणेशोत्सव मंडळांना विशेष प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात येणार आहे. या गणेश मंडळांची नावे देखील आज घोषित करण्यात आली.

जनसंपर्क विभाग आयोजित श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धेचे हे ३३ वे वर्ष असून यंदाच्या स्पर्धेत बृहन्मुंबईतील ५३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भाग घेतला होता. या गणेशोत्सव मंडळांच्या प्राप्त अर्जांची ३ गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. या अंर्तगत पहिल्या फेरीमध्ये ‘अ’ गटाद्वारे १७ सार्वजनिक गणेश मंडळे, ‘ब’ गटाद्वारे १८ सार्वजनिक गणेश मंडळे व ‘क’ गटाद्वारे १८ सार्वजनिक गणेश मंडळे यांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करण्यात आले. या अंतर्गत निर्धारित गुणांकन पद्धतीनुसार गुण देऊन अंतिम फेरीसाठी १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात आली.

या स्पर्धेकरीता परीक्षक म्हणून जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे निवृत्त प्रा. नितीन केणी, पाटकर महाविद्यालयाचे निवृत्त प्रा. आनंद पेठे, जे. के. ऍकेडमी ऑफ आर्ट ऍण्ड डिझाईनचे प्रा. नितीन किटुकले, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे सदस्य विकास माने, बृहन्‍मुंबई गणेश मूर्तिकार संघाचे सदस्‍य प्रदीप मुणगेकर आदींसह ९ तज्ज्ञ परीक्षकांनी परिक्षणाचे कामकाज पाहिले.

‘श्रीगणेश गौरव स्पर्धा – २०२२’ चा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे –

· प्रथम पारितोषिक (रु.७५,०००/-)

पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ, पंचगंगा संकुल, ना. म. जोशी मार्ग, मुंबई – १३

· द्वितीय पारितोषिक (रु.५०,०००/-)

युवक उत्कर्ष मंडळ, माऊंट मेरी शाळेच्या बाजूला, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई – ९५

· तृतीय पारितोषिक (रु.३५,०००/-)

स्वप्नाक्षय मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सव, ग्लोरिया सोसायटी जवळ, मॉडेल टाऊन, सात बंगला, अंधेरी (पश्चिम), मुंबई – ५३

· सर्वोत्कृष्ट मूर्ती (रु.२५,०००/-)

बालमित्र कला मंडळ, विजया हाऊस, स्टेशन मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई – ८३

· सर्वोत्कृष्ट नेपथ्य (रु.२०,०००/-)

रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, श्री. रामदूत हनुमान मंदिरा शेजारी, घाटकोपर (पूर्व), मुंबई – ७७

· दोन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु.१०,०००/-)

१) नवतरुण मित्रमंडळ, गांवदेवी मंदीर, गांवदेवी नगर, कोकणी पाडा, दहिसर (पूर्व), मुंबई – ६८

२) विकास मंडळ (साईविहार), साईविहार मार्ग, भांडुप (पश्चिम), मुंबई – ७८

· शाडू मातीची सर्वोत्कृष्ट मूर्ती – पारितोषिके (रु.२५,०००/-)

शिवशक्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रेमनगर, कांजूरमार्ग, कांजूरगांव (पूर्व), मुंबई – ४२

· प्‍लास्‍टीक बंदी / थर्माकोल बंदी उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेः (प्रत्येकी रुपये १०,०००/-)

१) श्री हनुमान सेवा मंडळ, काळा किल्ला, संत रोहिदास मार्ग, धारावी, मुंबई – १७

२) गं. द. आंबेकर मार्ग (काळेवाडी) सार्वजनिक उत्सव मंडळ, काळाचौकी, मुंबई – ३३

· अवयवदान / आरोग्य जागृतीः पारितोषिक रु.१५,०००/-

ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ताराबाग पटांगण, माझगांव, मुंबई – १०

प्रशस्तिपत्र प्राप्त गणेशोत्सव मंडळे

उत्‍कृष्‍ट मूर्तिसाठीः

१. बाळाशेठ मडुरकर (बी. एम.) मार्ग, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शिवराज भवन क्रमांक २ व प्राईम प्लाझा जवळ, बी. एम. मार्ग, प्रभादेवी (एल्फिन्स्टन रोड), मुंबई

२. श्री गणेश क्रीडा मंडळ, काजुवाडी, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई

३. रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ, काळाचौकी

४. खारवा गल्ली सार्वजनिक गणेश मंडळ, गिरगांव

नेपथ्यासाठीः

१. साईनाथ मित्र मंडळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई

२. आझाद नगर सार्वजनिक उत्सव समिती, अंधेरी (पश्चिम), मुंबई

३. लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ, मुंबई

४. सुभाष लेन गणेश साई सेवा मंडळ, कांदिवली (पश्चिम), मुंबई

प्रबोधनासाठीः

१. इलेव्हन इविल्स क्रिकेट क्लब, धारावी, मुंबई

२. अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ, घाटकोपर (पश्चिम), मुंबई

३. प्रतिक्षा नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, शीव – कोळीवाडा, मुंबई

४. श्री श्रद्धा मित्रमंडळ, दहिसर (पूर्व), मुंबई

पर्यावरण विषयक जनजागृतीसाठीः

१. शांतीनगर रहिवाशी संघ, मुलुंड (पश्चिम), मुंबई

२. ओम श्री सिद्धीविनायक मित्रमंडळ, साकीनाका, मुंबई

३. साईनाथ मित्रमंडळ, विक्रोळी (पूर्व), मुंबई

४. सार्वजनिक उत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई

सामाजिक कार्यासाठीः

  • बाळ गोपाळ मित्रमंडळ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई
  • निकदवरी लेन सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ, गिरगांव, मुंबई
  • कन्नमवार नगर – १ उत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई
  • सार्वजनिक गणेशोत्सव समिती, विक्रोळी (पूर्व), मुंबई
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.