Pandharpur Ashadhi Wari 2024: हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम!

209
Pandharpur Ashadhi Wari 2024: हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम!
Pandharpur Ashadhi Wari 2024: हाथरस चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा नदीच्या काठावर नवीन सिस्टीम!

आषाढी एकादशीचा सोहळा (Pandharpur Ashadhi Wari 2024) आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. अशातच आज दशमीला 10 ते 12 लाख भाविकांची मांदियाळी जमलेली दिसून येतेय. पंढरपूरच्या नामदेव पायरी, प्रदक्षिणा मार्गावर लाखोंच्या संख्येने भाविक उतरल्याने ओव्हर पॅक झाले आहे. शेकडो दिंड्या रस्त्यावर उतरल्याने हरिनामाच्या गजरात पंढरी नागरी दुमदुमून गेली आहे. पंढरपुरात भक्तीचा आणि भक्तांचा महापूर आलेला आहे. त्यामुळे सारी पंढरी अवघ्या महाराष्ट्राला आषाढीच्या सोहळ्यात विठ्ठलमय करण्यास सज्ज झालेली दिसते. (Pandharpur Ashadhi Wari 2024)

15 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार

चंद्रभागेच्या तीरावर चंद्रभागेच्या पवित्र स्नानसाठी भाविकांचा महासागर लोटला आहे. हाथरस दुर्घटनेनंतर प्रशासनाने अतिशय काटेकोर नियोजन केले असून चंद्रभागेच्या अरुंद घाटावरून टप्प्याटप्प्याने भाविकांना सोडण्यात येत आहे. चंद्रभागा पात्रात दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा रक्षकांच्या बोटींची गस्त सुरू आहे. दर्शन रांगेतील भाविकांना 15 लाख शुद्ध पाण्याच्या बाटल्या आणि मँगो ज्यूस दिला जाणार असून वापरलेल्या प्लास्टिक बाटल्या गोळा करून त्या नष्ट करण्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (Pandharpur Ashadhi Wari 2024)

महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार

मुख्यमंत्र्यांच्या पूजेच्यावेळी होणारी व्हीआयपी गर्दी (Pandharpur Ashadhi Wari 2024) टाळण्यासाठी देण्यात येणाऱ्या पासेसवर नियंत्रण आणण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. याशिवाय महापूजा सुरु असताना मुखदर्शनाची रांग सुरूच राहणार असून महापूजा कमीतकमी वेळेत करण्यासाठी मंदिर समितीशी चर्चा केली जाणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (Pandharpur Ashadhi Wari 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.