आषाढ महिना आला की वारकऱ्यांना वेध लागतात वारीचे. विठू माऊलीच्या दर्शनाचे. मात्र महाराष्ट्राबाहेर राहत असलेल्या मराठी माणसाला आपण विठ्ठलाला भेटू शकत नसल्याची रुखरुख राहते. हीच मराठी मनातील भावना लक्षात घेऊन दिल्ली मराठी प्रतिष्ठान मागील अनेक वर्षांपासून दिल्लीत सांकेतिक वारीचे आयोजन करीत आहेत. यात दिल्लीकर मोठ्या संख्येने आणि उत्साहात सहभागी होतात. (Pandharpur)
यावर्षी देखील बुधवार 17 जुलैला कनॉट प्लेस (Connaught Place) येथील प्राचीन हनुमान मंदिरातून वारीची सुरुवात होणार आहे. तर आर. के. पुरम येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात वारीचा कीर्तन, भजन आणि प्रसाद ग्रहण करून वारीचा समारोप होईल. (Pandharpur)
(हेही वाचा – Kalaram Temple : नाशिक येथील श्री काळाराम मंदिराचा प्राचीन इतिहास)
वारी संदर्भात महत्त्वपूर्ण सूचना
- वारीची सुरवात सकाळी ६ वाजता होईल त्यामुळे सर्वांनी ५:४५ वाजेपर्यंत पोहोचावे.
- वारी प्रस्थान मार्ग :- हनुमान मंदिर, कनॉट प्लेस, बाबा खडकसिंह मार्ग गोल डाकखाना, डॉ. राम मनोहर लोहिया हॅास्पिपटल, ११ मूर्ती, सरदार पटेल मार्ग, कौटिल्य मार्ग, शांतीपथ, मोतीबाग फ्लायओव्हर, राव तुलाराम मार्ग, मेजर सोमनाथ पथ, संगम सिनेमा, तमिल संगम, विठ्ठल मंदिर, रामकृष्ण पुरम.
- पावसाची शक्यता लक्षात घेऊन वारकऱ्यांनी स्वतःसोबत छत्री अथवा रेनकोट आणावे.
- वारीच्या मार्गात पिण्याची पाण्याची/सरबताची व्यवस्था राहील.
- पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था असली तरीही वारकरी स्वतःसोबत वॉटर बॅग ठेऊ शकतात. परंतु शक्यतो सामान वजनदार होणार नाही याची काळजी घ्यावी.
- वारकरी स्वतःसोबत टाळ, मृदंग, वीणा (एकतारी) आणू शकतात.
- स्वच्छता ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे. त्यांमुळे वारकऱ्यांनी आपल्याकडील कचरा हा कचरापेटीतच टाकावा.
- श्री. विठ्ठल मंदीर आर. के. पुरम येथे वारीच्या सांगतेनंतर चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- वारकर्यांनी शक्यतो मंगल वेषात यावे.
दिल्ली मराठी प्रतिष्ठान आयोजित सांकेतिक वारीला उत्तुंग प्रतिसाद मिळतोय. अद्यावत 1000 पेक्षा जास्त लोकांनी या वारी करता नोंदणी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community