Pandharpur : हिंदु महासभेचे नेते अभयसिंह कुलकर्णी यांची सावरकर चरित्रग्रंथाने ग्रंथतुला

47

कट्टरता आणि विवेक एका ठिकाणी असत नाहीत, असे म्हणतात, मात्र हिंदु महासभेचे नेते अभयसिंह इचगांवकर कुलकर्णी यांच्या व्यक्तिमत्वात कट्टर हिंदुत्वाबरोबरच विवेकाचा अनोखा संगम आहे. त्यांचा व्यासंग व अभ्यास मोठा असल्याने ते हिंदु समाजासाठी अधिक सक्षमपणे काम करू शकले, असे प्रतिपादन निरुपणकार ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलुकर (H.B.P. Chaitanya Maharaj Deglukar) यांनी केले. (Pandharpur)

हिंदु महासभेचे नेते अभयसिंह इचगांवकर कुलकर्णी (Abhay Singh Ichgaonkar Kulkarni) यांच्या एकसष्ठीनिमित्त त्यांचा आणि पत्नी सौ. वसुजा यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी देगलुकर महाराज बोलत होते. या वेळी त्र्यंबकेश्वरचे महामंडलेश्वर देवबाप्पा तथा फरशीवाले महाराज, ज्येष्ठ हिंदुत्ववादी गोरक्षक मिलिंद एकबोटे, हिंदू एकता आंदोलनाचे हिरामण गवळी, डॉ. गुरुनाथ परळे, मराठा महासंघाचे दास शेळके, प्राचार्य आशा शिंदे, प्रदेश हिंदु महासभेचे अध्यक्ष अनिल पवार उपस्थित होते.

(हेही वाचा – Vidya – Sapno Ki Udan चित्रपटाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात विशेष प्रिमियर शो)

या निमित्ताने अभयसिंह कुलकर्णी यांची सावरकर चरित्र ग्रंथाने (veer savarkar books) ग्रंथतुला करण्यात आली. श्रद्धा कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या गौरव स्मरणिकेचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. प्रदेश हिंदु महासभेचे (Hindu Mahasabha) अध्यक्ष अनिल पवार, तिरुपती रेडडी यांनी तलवार भेट देत अभयसिंह यांचा गौरव केला.

एकबोटे म्हणाले, ”हिंदु महासभा ही हिंदुत्वाची जननी आहे. अभयसिंह यांनी महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशभरातील लढाऊ हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कायम मदत केली.” या प्रसंगी प्रा. आशा शिंदे, डॉ. गुरुनाथ परळे यांनी अभयसिंह आणि इंचगावकर परिवाराच्या आठवणी सांगितल्या. या प्रसंगी महामंडलेश्वर फरशीमहाराज यांनी आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. रश्मी कुलकर्णी गंधे यांनी सावरकरांचे ‘अनादी मी’ हे गीत सादर केले. प्रास्ताविक ह.भ.प. शंकर महाराज बडवे यांनी केले. स्वागत पत्रकार महेश खिस्ते यांनी केले. आभार प्रदर्शन मंदार कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मैत्रैयी केसकर यांनी केले. (Pandharpur)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.