आषाढी एकादशीच्या निमित्ताने रेल्वे दि. ११.७.२०२२ ते १४.७.२०२२ पर्यंत हुबळी आणि पंढरपूर दरम्यान पूर्णपणे अनारक्षित विशेष गाड्या चालवण्यात आल्या आहेत.
तपशील खालीलप्रमाणे
- ट्रेन क्र. 07351 विशेष हुबळी येथून दि. ११.७.२०२२ ते १४.७.२०२२ पर्यंत दररोज पहाटे ३.०० वाजता सुटेल आणि पंढरपूर येथे त्याच दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल.
- ट्रेन क्रमांक 07352 विशेष पंढरपूर येथून दि. ११.७.२०२२ ते १४.७.२०२२ पर्यंत दररोज १.०० वाजता सुटेल आणि हुबळी येथे त्याच दिवशी रात्री ११.०० वाजता पोहोचेल.
( हेही वाचा Shivsena: शिवसेनेचे हकालपट्टीचे सत्र सुरुच; आता रवींद्र फाटक आणि राजेश शहांवर कारवाई )
*थांबे*: धारवाड, अलनावर, लोंडा, खानापूर, बेळगावी, सुळेभावी, सुलधाळ, पाच्छापूर, गोकाक रोड, घाटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, चिंचली, कुडाची, उगार खुर्द, शेडबाळ, विजयनगर, मिरज, आरग, कवठेमहांकाळ जत रोड, सांगोला
*संरचना*: १० शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.
Join Our WhatsApp Community