आषाढी यात्रेनिमित्त येत्या ७ जुलैपासून पंढरपुरातील (Pandharpur) श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे २४ तास दर्शन सुरू राहणार आहे. आषाढी यात्रेच्या नियोजनाविषयी पंढरपुरात मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या नेतृत्वात एक बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
येत्या १७ जुलै रोजी पंढरपुरात (Pandharpur) आषाढी यात्रेचा सोहळा पार पडणार आहे. या यात्रेतील शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंदिर समितीच्यावतीने निमंत्रणही देण्यात आले. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचा औसेकर महाराजांच्या हस्ते विणा, वारकरी पटका, श्रींची मूर्ती, उपरणे, चिपळ्या देऊन सन्मान करण्यात आला.
याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचाही मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे २.२० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community