श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रेला आलेल्या भाविकांसाठी यंदा १५ लाख प्रसाद लाडू बनवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी यात्रा अवघ्या चार दिवसांवर आल्याने लाडू बनवण्याची लगबग सुरू असून दररोज सुमारे ५० हजार बुंदी लाडू तयार करण्यात येत आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मागील वर्षी प्रसाद लाडू बनविण्याचे काम खासगी ठेकेदाराला देण्यात आले होते. यावर्षी मात्र मंदिर समिती आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून प्रसादाचे बुंदी लाडू बनवीत आहे. बुंदी लाडू तयार करण्यासाठी बेसन, साखर, डबल फिल्टर शेंगदाणा तेल, बेदाणे, काजू, वेलदोडा, जायफळ या जिन्नसांचा वापर केला जात आहे.
एक क्विंटल हरभरा डाळीसाठी दीड क्विंटल साखर वापरण्यात येत आहे. दररोज दिवस व रात्रपाळी मध्ये मिळून सुमारे ८० कर्मचारी लाडू बनवण्याचे काम करीत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून दररोज ५० हजार लाडू बनविण्यात येत आहेत.
(हेही वाचा Jawaharalal Nehru: जवाहरलाल नेहरूंमुळे भारताचा फुटबॉल संघ ऑलिम्पिकमध्ये खेळाला होता अनवाणी )
Join Our WhatsApp Community