पालघर, रायगडमध्येही कोरोनाचा प्रसार वाढला

कोरोनाच्या वाढत्या केसेसमध्ये आता पालघर आणि रायगड जिल्ह्यातील रुग्णांमध्येही वाढ होऊ लागली आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुण्याखालोखाल आता पालघर आणि रायगडमध्ये कोरोनाच्या अनुक्रमे ४४६ तर ५३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या आता १६ हजार ३७० वर पोहोचली आहे.

बरे होण्याचे प्रमाण ९७.९२ टक्क्यांवर

रविवारच्या नोंदीत मुंबईत १ हजार ८०३, ठाण्यात ग्रामीण भागात ३२, ठाणे शहरात २५०, नवी मुंबईत २४३, पालघरमध्ये ८ तर रायगडमध्ये ५५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. मुंबई महानगर प्रदेशाव्यतिरिक्त पुणे शहरात ११२, नागपूर ग्रामीण भागात १२, तर नागपूर शहरात २९ नवे रुग्ण आढळले. मुंबईत आता १९ हजार ८८९ कोरोना रुग्णांवर उपचार दिले जात आहेत. ठाण्यात २ हजार ८०५, तर पुण्यात १ हजार १२८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. या शहरांसह पालघर आणि रायगड शहरांतील वाढती कोरोना संख्या सध्या आरोग्य विभागासाठी मोठे आव्हान बनले आहे. नागपुरातही १७१ कोरोना रुग्णांना सद्यस्थितीत उपचार दिले जात आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२ टक्क्यांवर आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

  • रविवारी राज्यात आढळलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या – २ हजार ९४६
  • रविवारी कोरोना उपचारांतून बरे झालेल्या रुग्णांची संख्या –  १ हजार ४३२

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here