प्रवाशांना गरजेच्यावेळी किंवा संकटकाळात मदत मिळावी यासाठी रेल्वे स्थानकातील फलाटांवर पॅनिक बटण बसवण्यात येणार आहेत. यामध्ये देशभरातील ७५६ स्थानकांपैकी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागातील ७९ स्थानकांचाही समावेश आहे. रेल्वे स्थानकांवर पॅनिक बटण बसवणार असल्याची माहिती रेलटेलकडून देण्यात आली आहे. यात प्रत्येक फलाटावर दोन पॅनिक बटण बसवण्यात येणार आहेत.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ AC डबल डेकर बस सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल!)
संकटकाळात पॅनिक बटण दाबल्यास त्वरित फलाटावरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत होतील आणि हे कॅमेरे दिशा बदलून त्वरीत संबंधित व्यक्तीकडे वळतील आणि तेथील घटना कॅमेऱ्यामध्ये कैद होईन अलार्म वाजेल. यामुळे स्थानकातील नियंत्रण कक्षांना तात्काळा प्रवाशांपर्यंत पोहोचणे शक्य होईल. जानेवारी २०२३ पर्यंत ही प्रणाली स्थानकांवर बसवली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
या स्थानकात मिळणार सुविधा
ऐरोली, अंबरनाथ, आंबिवली, आसनगाव, बदलापूर, भांडुप, भिवपुरी रोड, भायखळा, चेंबूर, चिंचपोकळी, चुनाभट्टी, कॉटन ग्रीन, करीरोड, दिवा, डॉकयार्ड रोड, डोलवली, डोंबिवली, घणसोली, घाटकोपर, गोवंडी, गुरु तेज बहादूर नगर, इगतपुरी, जुईनगर, कळवा, कांजुरमार्ग, कर्जत, कसारा, केलवली, खडवली, खांदेश्वर, खर्डी, खारघर, खोपोली, किंग्ज सर्कल, कोपर, कोपरखैरणे, लोणावळा, लौजी. मानखुर्द, मानसरोवर, मशीद रोड, माथेरान, माटुंगा, मुलुंड, मुंब्रा, नाहूर, नेरळ, नेरुळ, पळसदरी, पनवेल, परेल, रबाळे, रे रोड, सॅन्हडस्र्ट रोड, सानपाडा, सीवूड दारावे, शिवडी, शहाड, शेलू, सायन, ठाकुर्ली, टिळकनगर, टिटवाळा, तुर्भे, उल्हासनगर, वडाळा रोड,वांगणी, वाशी, वाशिंद, विद्याविहार, विक्रोळी आदी स्थानकांचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community