हरियाणातील (Haryana) पानीपत युद्धाला १४ जानेवारी २०२५ ला २६४ वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने शौर्य स्मारक समितीतर्फे (Shaurya Smarak Samiti) पानीपत युद्धात आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या योद्धयांना आदरांजली अर्पण केली जाणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रम पानीपतावर होणार आहेत. या हरियाणातील पानीपतावरील कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) प्रामुख्याने उपस्थित असणार आहेत. तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) , माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत.
( हेही वाचा : Hawkers : टोरेसमुळे महापालिका आणि पोलिसांना रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आतील फेरीवाले दिसले?)
शौर्य स्मारक समितीचे प्रमुख प्रदीप पाटील (Pradeep Patil) यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत कार्यक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले की, १४ जानेवारीला पानीपताचे युद्ध झाले होते. मराठे आणि अहमदशाह अब्दाली यांच्या हे युद्ध झाले होते. त्यावेळी अनेक मराठ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. या युद्धाला दि. १४ जानेवारी २०२५ रोजी २६४ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातसह अनेक राज्यातून लोक या कार्यक्रमाला हजेरी लावतील.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community