कोकणातून परतीच्या प्रवासासाठी गाड्या फुल्ल; १२ सप्टेंबरपर्यंत पनवेल – चिपळूण विशेष डेमू सेवा

183

गौरी-गणपती बाप्पाला निरोप दिल्यानंतर आता कोकणातील चाकरमानी मुंबईकडे परतीच्या प्रवासासाठी निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी आहे. तर दुसऱ्या बाजूला कोकण रेल्वेचे आरक्षण सुद्धा फुल्ल झाले आहे. याच पार्श्वभूमीवर गणपती उत्सवामुळे प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पनवेल ते चिपळूण दरम्यान डेमू विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष डेमू सेवाचा तपशील खालीलप्रमाणे आहे…

  • 01597 DEMU पनवेल येथून दिनांक 7 सप्टेंबर 2022 ते 12 सप्टेंबर 2022 पर्यंत दररोज 19.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.50 वाजता चिपळूण येथे पोहोचेल.
  • 01598 DEMU चिपळूण येथून दिनांक 7 सप्टेंबर 2022 ते 12 सप्टेंबर 2022 पर्यंत दररोज दररोज 13.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी पनवेल येथे 18.30 वाजता पोहोचेल.

संरचना: 8 डेमू कोच

थांबे: रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, खेड.

या विशेष गाड्यांचे तिकीट प्रवासी यूटीएस प्रणालीद्वारे बुक करू शकतात. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.