पनवेल-कर्जत (Panvel-Karjat) उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील सर्वात मोठा वावर्ले बोगदा खोदण्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून नढाळ आणि किरावली बोगदा खणण्याचे काम सुरू आहे. सुमारे तीन हजार १४४ मीटर लांबीच्या तिन्ही बोगद्यांचे ८० टक्यांपेक्षा जास्त काम पूर्णत्वास गेल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प ३ (एमयूटीपी ३) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतला आहे. आतापर्यंत पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर सुरू असून आहे.
(हेही वाचा – Japan Earthquake: जपानमध्ये पुन्हा भूकंपाचा धक्का, ओकिनावामधील मुख्य विमानतळावरून उड्डाणे स्थगित)
प्रकल्पाकरिता ३०० कोटी रुपयांचा निधी
या मार्गाकरिता २ हजार ७८२ कोटी रुपये खर्च येणार असून या मार्गाची लांबी ३० किमी आहे. २०२४-२५च्या अंतरिम अर्थसंकल्पात या प्रकल्पाकरिता ३०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यामार्गामुळे प्रवास वे ळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. पनवेल-कर्जत (Panvel-Karjat) या नव्या २९.६ किमीच्या दुहेरी रेल्वेमार्गावर पनवेल, चौक, मोहापे, चिखले, कर्जत अशी पाच स्थानके आहे. ३.१२ किमीचे तीन रेल्वे बोगदे आहेत तसेच या रेल्वेमार्गावर दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे पूल आणि ३६ लहान पूल असणार आहे.
बोगद्याच्या कामाची सद्यस्थिती…
– नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. यापैकी वावर्ले बोगदा हा २६२५ मीटर लांबीचा आहे. आतापर्यत २६२५ मीटरपैकी २,४२५ मीटर जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. पुढील काम प्रगतीपथावर आहे. नढाल बोगद्याची लांबी २१९ मीटर असून आतापर्यत जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. पाणीगळती रोखण्याचे काम सुरू आहे. तर किरवली बोगदा ३२० मीटर लांबीचा असून जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले. सुमारे तीन हजार १४४ मीटर लांबीच्या तिन्ही बोगद्यांचे ८० टक्यांपेक्षा जास्त काम पूर्णत्वास गेल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community