पनवेल-कर्जत (Panvel-Karjat) नवा कॉरिडॉर लवकरच अस्तित्वात येणार आहे. त्यासाठी पनवेल-कर्जत दरम्यान सर्वात लांबीचा मोठा बोगदा उभारण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई महापालिका बांधत आहे. पनवेल आणि कर्जत ही CSMT स्टेशनवरुन दोन दिशेला असलेली शेवटची रेल्वे स्थानके आहेत. पनवेल हे मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील शेवटचे रेल्वे स्थानक आहे. तर, कर्जत हे मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय रेल्वेचे शेवटचे स्थानक आहे.
(हेही वाचा लहान मुलांच्या Mobile वापरावर निर्बंध आणण्याचा ‘या’ समाजाचा निर्णय; शाळांमध्ये जनजागृती करणार)
पनवेलहून कर्जतला (Panvel-Karjat) जायचे असेल तर ट्रान्स हार्बर मार्गाने ठाणे स्टेशनला येवून पुन्हा मध्य रेल्वेवरील लोकल पकडावी लागते. नवीन कॉरिडोरमुळे पनवेल आणि कर्जतच्या (Panvel-Karjat) मध्ये थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रकल्पाअंतर्गत पनवेल कर्जत उपनगरीय रेल्वे कॉरिडोर उभारला जात आहे. जवळपास 2,782 कोटींचा हा नव्या रेल्वे मार्गाचा मेगा प्रोजेक्ट आहे. 29.6 किमी लांबीच्या या नव्या रेल्वे मार्गावर तीन बोगदे असून तिन्ही बोगद्यांचे खोदकामास सुरुवात झाली आहे. सध्याच्या ठाणे-दिवा दरम्यान 1.6 किमी पारसिक बोगदा हा सर्वात मोठा बोगदा आहे. भारतीय रेल्वेवरील एक किमीपेक्षा जास्त लांबीचा हा पहिला बोगदा आहे. मात्र, पनवेल-कर्जतदरम्यानच्या (Panvel-Karjat) वावर्ले येथील 2.6 किमी लांबीचा बोगदा उभारला जात आहे. हा मार्ग तयार झाल्यास सीएसएमटी-कर्जत मार्गे पनवेल हा रेल्वेचा नवा पर्याय उपलब्ध होईल.
Join Our WhatsApp Community