Panvel-Karjat उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम प्रगतिपथावर; ६७ टक्के काम पूर्ण  

37
मुंबई आणि उपनगर परिसरातील रेल्वे (Suburban Railway) परिवहन विस्तारासाठी महत्त्वाकांक्षी पनवेल- कर्जत लोकल रेल्वे (Panvel-Karjat Local Railway) कॉरिडोरचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. मुंबई शहरी परिवहन प्रकल्प-३ अंतर्गत राबविलेल्या या प्रकल्पाचे सुमारे ६७ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (Mumbai Railway Development Corporation) दिली आहे.. या प्रकल्पासाठी २,७८२ कोटींचा खर्च अंदाजित आहे. (Panvel-Karjat)
(हेही वाचा –Evm Machine : ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून सुरू असलेल्या सर्व वादांना पूर्णविराम! ) 
एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष चंद्र गुप्ता यांनी सांगितले की, हा कॉरिडोर सुरू झाल्यावर उपनगरी रेल्वे नेटवर्कसह संपूर्ण परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल. प्रकल्पासाठी ५६.८२ हेक्टर खासगी जमीन आणि वनजमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे, हे तसेच दोन दशलक्ष घनमीटर मातीचे १ भरावकामही यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील २,६२५ मीटर – लांब वावरली टनेल हा मुंबई लोकल कॉरिडोरमधील सर्वांत लांब बोगदा आहे. त्याचे १०० टक्के भूमिगत खोदकाम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात एकूण ३,१०० मीटर लांबीचे तीन बोगदे बांधले जात आहेत. यामध्ये ३०० मीटर लांब किरावली टनेल आणि २१९ मीटर लांब नढाल टनेलचे काम प्रगत स्थितीत आहे. न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धतीचा वापर करून बोगद्यातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आला आहे.

(हेही वाचा – ‘भाई जगताप यांचे वक्तव्य म्हणजे निवडणूक आयोगाचा अपमान’; काँग्रेस नेत्याला Kirit Somaiya यांचे चोख प्रत्युत्तर )

दरम्यान, पनवेल ते कर्जतदरम्यान हार्बर लाइन आणि सेंट्रल मेन लाइनला जोडणारा हा मार्ग २९.६ किमींचा असून प्रवासाचा वेळ ३० ते ३५ मिनिटांनी कमी होणार आहे. हा प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

स्टेशन पायाभूत सुविधा

– स्टेशन इमारती: पनवेल, चिखले, मोहपे, चौक आणि कर्जत स्थानकात स्थानक आणि सेवा इमारतींचे बांधकाम प्रगतीपथावर आहे.
– सुविधा: प्लॅटफॉर्म, फूट ओव्हरब्रिज आणि प्रशासकीय इमारतींसह उपयुक्तता संरचनांची प्रगती सातत्याने होत आहे.


हेही पाहा –
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.