दोन वर्षांपासून बंद असलेली उरण ते पनवेल बोकडवीरा एसटी सेवा (ST Services) अखेर दोन वर्षांनंतर सुरू करण्यात आली आहे. या एसटीच्या मागणीसाठी जनवादी महिला संघटनेने अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता.
उरण पनवेल राज्य महामार्गावरील सिडको कार्यालयाजवळचा फुंडे पूल नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून उरण-बोकडवीरामार्गे एसटी प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे बोकडवीरा, पाणजे, फुंडे, डोंगरी, म.रा.वि.म. वसाहतीमधील विद्यार्थी, कामगार, सर्वसामान्य प्रवासी, दैनंदिन रोजगाराला जाणाऱ्या महिलांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे ही एसी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून होत होती. नागरिकांनीही वारंवार हा पूल दुरुस्त करण्यासाठी सिडकोकडे मागणी केली होती, मात्र सिडको अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत होते. म्हणून पर्यायी रस्ता तयार असल्याने पूल दुरुस्ती होईपर्यंत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने बोकडवीरामार्गे एसटी बस सुरू करण्याच्या मागणीसाठी सतत दोन वर्षे पाठपुरावा करण्यात शिवाय ३० जून रोजी मुंबईतील मुख्यालय, उरण तहसीलदार आणि आगार व्यवस्थापक निवेदन देऊन बोकडविरामार्गे एसटी बसचा मार्ग करण्यात यावा, अशी मागणी केली. त्यानंतर तीन महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर ही एसटी पुन्हा सुरू झाली.
(हेही वाचा – Dahisar-Bhayandar : दहिसर-भाईंदर उन्नत मार्ग प्रकल्पाच्या खर्चात वाढ, काँग्रेस म्हणते…)
ही एसटी सोमवारी सकाळी ६.५५ वाजता पहिली उरण बोकडवीरामार्गे पनवेल बस सुरू करण्यात आली, अशी माहिती आगार प्रमुख अमोल दराडे यांनी दिली तसेच उरण ते पनवेल आणि उरण ते दादर या दोन मार्गांवरील बसेस सेवा सुरू करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हेमलता पाटील यांनी दिली. उरण-पनवेल बोकडवीरामार्गे सकाळी ६.५५, ८.००, ८.०५, ९.१० वाजता तर दुपारी १६.१५,१७.२०,१७.३०,१८.३५ वाजता तर उरण दादर बोकडवीरा मार्गे सकाळी ७.३० ,९.२५,९.३०,११.२५ वाजता, दुपारी १५.३०,१७.२५,१७.३०,१९.२५ या वेळापत्रकानुसार या दोन्ही मार्गावर एसटी बस सुरू करण्यात आली आहे.
हेही पहा –