परमबीर सिंग राज्य सरकारच्या विरोधात पुन्हा उच्च न्यायालयात! 

जर तक्रार मागे घेतली नाही, तर आपल्याविरोधात राज्य सरकार अनेक गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे म्हणाल्याचे परमबीर सिंग म्हणाले. 

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याच्या गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीर सिंग यांनी याआधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची खंडणी वसुलीच्या मुद्यावरून सीबीआय चौकशी करण्याच्यामागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात गेले होते, आता ते पुन्हा एकदा सरकारच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.

काय म्हटले परमबीर सिंग यांनी याचिकेत? 

  • १९ एप्रिल रोजी आपण राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांची भेट घेतली.
  • त्यावेळी त्यांनी आपल्याला तक्रार मागे घेण्यास सांगितले.
  • जर तक्रार मागे घेतली नाही, तर आपल्याविरोधात राज्य सरकार अनेक गुन्हे दाखल करणार असल्याचे पांडे म्हणाले.
  • त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी व्हावी.

(हेही वाचा : देवा रं देवा… सरकार म्हणतं दोन तासांत ‘लग्न’ लावा! वाचा काय आहेत ‘लग्नाळूंच्या’ वेदना)

सिंग यांच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल 

दरम्यान परमबीर सिंग यांच्या विरोधात अकोला येथील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टसह विविध २२ कलमांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्याच्या पोलिस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here