केंद्र सरकारने संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे विधेयक बहुमताने पारित केले. त्यानंतर निमलष्करी दलातही ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र निमलष्करी दलात महिलांची तैनाती केवळ ३.२९ टक्के एवढीच आहे. संसदेच्या सुरक्षेत तैनात सीआयएसएफसह निमलष्करी दलाच्या (Paramilitary force) पाचही शाखेत कार्यरत महिला काँनस्टेबलची संख्या मंजूर पदांपेक्षा खूप कमी आहे.
( हेही वाचा : Mumbai-Delhi Tunnel Collapse : बांधकाम सुरु असतांनाच कोसळला दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवरील बोगदा; मजूर मृत्यूमुखी)
मिळालेल्या आकडेवारीनुसार, सीआरपीएफसाठी (Central Reserve Police Force) जूर पदे ३ लाख २५ हजार १८२ असून नियुक्त महिलांची संख्या फक्त ६ हजार ५१३ इतकीचं आहे. टक्केवारीनुसार फक्त २. १७ टक्के महिला सीआरपीएफमध्ये तैनात आहेत. बीएसएफमध्ये मंजूर पदांपैकी ९ हजार ९३६ इतक्याच महिलांची नियुक्ती करण्यात आली असून ती टक्केवारीनुसार ३. ८६ टक्के आहे. त्याशिवाय सीआयएसएफमध्ये ४. १६ टक्के महिला नियुक्त आहेत. आयटीबीपीमध्ये ३.१३ टक्के महिला तैनात आहेत. एसएसबीत ४. १ टक्के महिला तैनात आहेत. आसाम रायएलमध्ये ३. ०९ टक्के महिला तैनात असून एकूण निमलष्करी दलात (Paramilitary force) १० लाख २८ हजार ७२२ महिलांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी ३१ हजार ३५५ महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. म्हणजे एकूण आकडेवारीनुसार ३. २९ टक्के महिलांची नियुक्त करण्यात आली आहेत. (Paramilitary force)
दरम्यान गृह राज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) यांनी दिलेल्या माहितीनुसार, निमलष्करी दलांत एकूण ३१ हजार ३५५ महिला तैनात आहेत. तसेच सीआयएसएफ आणि सीआरपीएफमध्ये (Central Reserve Police Force) कॉन्स्टेबल पदासाठी ३३ टक्के पदे राखीव आहेत. बॉर्डर सिक्युरिटी फोर्स(Border Security Force), सशस्त्र सीमा बल आणि इंडो- तिब्रेटियन बॉर्डर पोलिसमध्ये महिलांना १४ ते १५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. (Paramilitary force)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community