परशुराम घाटातून एकेरी वाहतूक सुरू

89

रत्नागिरी जिल्ह्यात पूर परिस्थिती नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ३० जुलै २०२२ पर्यंत सकाळी ६ पासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अवजड वाहनाची फक्त एकेरी वाहतूक सुरू राहील तर, सायंकाळी ७  ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच राजापूर कोल्हापूर यांना जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटातील दरड कोसळल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात दोन एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : अडीच वर्षांनी वरळीकरांना लाभले आमदारांचे दर्शन)

पावसाचा कहर : पुरात अडकलेल्या ८०० नागरिकांचे स्थलांतर

चंद्रपूर, वरोरा व भद्रावती तालुक्यातील पुरात अडकलेल्या ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत असून, ‘एसडीआरएफ’ची एक टीम आणि स्थानिकांच्या सहाय्याने वर्धा नदी पात्रालगतच्या गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येत असल्याची माहिती मंत्रालयातील नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्यात सध्याची परिस्थिती आटोक्यात आहे. परंतु मंगळवारी सायंकाळनंतर प्राणहिता नदी पात्रात पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता असून, पुन्हा पुरपरिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एसडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात परिस्थिती आटोक्यात असली, तरी वर्धा नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत आहे. मूल तालुक्यातील १२ जण शेतात अडकले असून, तेथे बचाव कार्य सुरू आहे. वरोरा व भद्रावती येथील ८०० नागरिकांचे स्थलांतरण करण्यात येत आहे. वर्धा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १३६ मीमी सरासरी पाऊस झाला. जिल्ह्यातील हिंगणघाट, समुद्रपूर, सेलू तसेच देवळी या तालुक्यांत मुसळधार पावसामुळे काही नागरिक पुराच्या पाण्यात अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या बचावाकरिता एनडीआरएफची एक टीम व एसडीआरएफची एक टीम तैनात करण्यात आली आहे. आतापर्यंत ३९७ लोकांना १० निवारा केंद्रात सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.

पुराने २८ जिल्हे प्रभावित

राज्यात पुरामुळे २८ जिल्हे आणि २८९ गावे प्रभावित झाली असून, ८३ तात्पुरती निवारा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत १२ हजार २३३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. आतापर्यंत अतिवृष्टीमुळे १०८ नागरिकांनी जीव गमावला असून, तर १८९ प्राणी दगावले आहेत. पावसामुळे आतापर्यंत ४४ घरांचे पूर्णत:, तर १३६८ घरांचे अशंत: नुकसान झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.