मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा आंतरवालीत आंदोलन सुरु आहे. राज्यातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आंदोलन सुरु आहेत. मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी बुधवार (१ नोव्हेंबर) परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. जिल्हाभरातील बाजारपेठ बंद आहेत. सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णयघेण्यात आला आहे. (Maratha Reservation)
परभणी जिल्ह्यातील गावा गावांमध्ये आंदोलन सुरू झाले आहेत आता हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे. शहरात तीन ठिकाणी तर जिल्हाभरात ठिकठिकाणी चक्काजाम केला जाणार आहे. सर्व प्रकारची शेतमाल वाहतूक बंद करण्यात येणार आहे. सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे. एकीकडे साखळी उपोषण आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे.या बंद बरोबरच झरी बोरी आणि सिंगणापूर या तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
(हेही वाचा : Kolhapur : गळीत हंगामाचा शुभारंभ, साखर कारखान्यांची धुरांडी पेटणार)
मराठा आरक्षण आंदोलकांच्या धास्तीमुळे परभणीची बाजारपेठ बंद
परभणी शहरासह जिल्हाभरात मंगळवारी मराठा आरक्षणासाठी तब्बल तेरा पेक्षा जास्त ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते . या आंदोलनाच्या बरोबरच मानवत आणि संपूर्ण शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र परभणी शहरात काही तरुणांचे गट दुचाकीवरून घोषणाबाजी करत फिरत असल्यामुळे परभणीची बाजारपेठ मंगळवारपासून बंद ठेवण्यात आलेली आहे. या तरुणांच्या धास्ती मुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकान बुधवारी उघडलीच नाहीत.
हेही पहा –