आधार कार्ड हे आजच्या काळासाठी अत्यंत आवश्यक कागदपत्र आहे. आज प्रत्येकाला आपली ओळख पटवून देण्यासाठी आधार कार्ड दाखवावे लागते. अशा परिस्थितीत आधार कार्ड फक्त मोठ्यांसाठी आवश्यक आहे की, लहान मुलांनाही त्याचा काही उपयोग आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लहान मुलांसाठी बाल आधार कार्ड
अशा परिस्थितीत, UIDAI च्या नियमांनुसार, तुम्ही तुमच्या 5 वर्षांपेक्षा लहान मुलांसाठी, अगदी नवजात मुलांसाठी आधार कार्ड बनवू शकता. मुलांत आधार कार्ड हे मोठ्यांपेक्षा वेगळ असणार आहे. या आधार कार्डला बाल आधार कार्ड नाव देण्यात आलं आहे. या आधार कार्डचा रंग निळा आहे. नुकतेच UIDAI ने आपल्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आणि सांगितले की, प्रत्येकजण आपले आधार कार्ड नोंदणी करू शकतो. यासाठी फक्त मुलाचा जन्म पुरावा आणि पालकांचे आधार कार्ड आवश्यक आहे.
( हेही वाचा: लस नाही तर ट्रेन प्रवास का नाही? न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले )
अपडेट करुन घ्यावं लागेल
मात्र, मुलाचे वय पाच वर्षांपेक्षा जास्त असेल तेव्हा मुलांचे आधार कार्ड अपडेट करावे लागेल. यासाठी UIDAI ने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, निळ्या रंगाचे आधार कार्ड 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बनवले आहे. मूल पाच वर्षांचे झाल्यावर ते आधार कार्ड अवैध ठरते. मुलाचे आधार पुन्हा सक्रिय करण्यासाठी बायोमेट्रिक अपडेट आवश्यक आहे.
नोंदणी कशी करावी
बाल आधारमध्ये मुलांच्या नाव नोंदणीसाठी, पालकांना त्यांच्या जवळच्या आधार केंद्रावर जावे लागेल. तेथे गेल्यानंतर पालकांना नाव नोंदणी अर्ज भरावा लागेल. यामध्ये मुलाचा कोणताही डेटा विचारला जाणार नाही. जर मुलाचे वय 5 ते 15 वयोगटातील असेल तर, त्याचे फिंगरप्रिंट आणि चेहऱ्याचे चित्र काढले जाईल. याशिवाय त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
Join Our WhatsApp Community