Park Avenue : १०० % देशी ब्रँड पार्क अव्हेन्यूला परदेशात विस्ताराची संधी

91

स्वातंत्र्यानंतर भारतात पहिला पॉलिस्टर कपड्यांचा ब्रँड भारतात आणण्याचा मान रेमंड्स कंपनीला जातो. त्यांनी १९५० च्या दशकात भारतात कॉटन आण सिल्क सोडून इतर कपडा उत्पादन करण्यासाठी आपला कारखाना सुरू केला. नेसली वाडिया हे रेमंड्सचे मालक. पॉलिस्टर कापड उत्पादन हा भारतासाठी नवीन प्रकार होता. इथल्या लोकांची नाळ खादीशी जुळलेली. आणि तलम पॉलिस्टर कापड इंग्लंडमधून येतं असं डोक्यात रुजलेलं असल्यामुळे सुरुवातीला भारतीय कपड्यांच्या ब्रँडची नावंही परदेशीच असायची. व्हॅन होसेन हा आदित्य बिर्ला फॅशनचा ब्रँड आहे, हे किती जणांना ठाऊक आहे?

रेमंडचंही सुरुवातीला असंच धोरण होतं. बाँबे डाईंग नावाने त्यांनी पहिला कपड्याचा ब्रँड लाँच केला. आणि हळू हळू तयार कपड्यांच्या बाजारपेठेत कंपनी उतरली ती पार्क ॲव्हेन्यू (Park Avenue) या नवीन कोऱ्या आणि श्रीमंत लुक असलेल्या ब्रँडसह. खासकरून पुरुषांचे तयार कपडे, परफ्युम, बेल्ट असा वस्तू या ब्रँड अंतर्गत बनतात.

(हेही वाचा Bhaichung Bhutia : भारतीय फुटबॉल असोसिएशन बरखास्त करण्याची मागणी बायचुंग भुतिया का करतोय?)

देशात ५८० पेक्षा जास्त रेमंड्स दुकानातून या प्रिमिअम ब्रँडचं वितरण केलं जातं. शिवाय पार्क ॲव्हेन्यूची (Park Avenue) स्वत:ची अशी ३५ एक्सक्लुझिव दुकानं आहेत. याशिवाय ४०० हून अधिक रिटेल दुकानांशी त्यांचा भागिदारीचा करार झालेला आहे. प्रिमिअम ब्रँड असल्यामुळे शहरांमध्ये तो जास्त चालतो. आणि त्यासाठी चोख वितरण व्यवस्था कंपनीने ठेवली आहे.

आता कंपनीला दुसऱ्या तसंच तिसऱ्या क्रमांकाच्या शहरांमध्ये विस्ताराची संधी आहे. आणि त्याच दृष्टीने कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. कारण, भारतीय कापड उद्योग विस्तारतोय. आणि वर म्हटल्याप्रमाणे आदित्य बिर्ला फॅशन, रिलायन्स रिटेल अशा कंपन्या स्पर्धेसाठी उभ्या आहेत. त्यामुळे पार्क ॲव्हेन्यूला (Park Avenue) देशभरात विस्तार वाढवायचा आहे. तसंच भागिदारी तत्त्वावर त्यांना परदेशातही शिरकाव करायचा आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.