बेस्ट आगारांच्या जागेत पार्किंग ठरणार BEST : पार्क+ या मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून डिजिटल ‘वॅले पार्किंग’ आणि ‘स्वयं पार्किंग’

131

येत्या ७ ऑगस्ट २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाच्या महापालिकाकरणाला ७५ वर्षे होत असून बेस्ट उपक्रमातर्फे ‘अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्त विविध योजना राबवण्यात येत आहेत. या अनुषंगाने ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ योजनेचे संगणकीकरण करण्यात येत आहे. तसेच ‘वॅले पार्किंग ही नवीन संकल्पनाही सुरु करण्यात येत आहे. ज्याद्वारे बस आगार आणि बस स्थानकांच्या जागेत सहजगत्या माहिती मिळवून आपली वाहने नागरिकांना पार्क करता येतील.

मुंबईतील रस्त्यावरील अनधिकृत पार्किंग कमी करून रस्ते वाहतुकीला मोकळे होण्याकरीता बेस्ट उपक्रमाने सन २०१९ पासून ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ ही योजना सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गत दिवसा उपक्रमाच्या बसगाडया बसमार्गावर प्रवर्तित होत असल्याने बेस्ट बस आगार व बसस्थानकांमधून रिकाम्या जागी खाजगी वाहनधारकांना त्यांची वाहने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे. या योजनेला मुंबईतील वाहनधारकांनी समाधानकारक प्रतिसाद दर्शविलेला आहे. अमृतमहोत्सवी ‘बेस्ट दिनाचे औचित्य साधून दि.७ ऑगस्ट २०२२ पासून वॅले पार्किंग ही नवीन संकल्पनाही सुरु करण्यात येत आहे.

परवीओम टेक्नोलॉजिज प्रा. लि. ज्या कंपनीला पार्क +” या नावाने ओळखण्यात येते, त्या कंपनीच्या माध्यमातून या योजनेचे संगणकीकरण करण्यात येत आहे. पार्क अ‍ॅपच्या सहाय्याने वाहनधारकांना मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या बसआगार व बसस्थानकांमध्ये पार्किंगकरीता उपलब्ध असलेल्या जागेबाबत माहिती सहजगत्या प्राप्त होवू शकेल. यामुळे वाहनधारक त्यांना हवे असलेल्या ठिकाणी आगाऊ जागा आरक्षित करून घेऊ शकतात. परिणामी अगदी शेवटच्या क्षणी वाहनांकरीता जागा न मिळाल्यामुळे होणारी गैरसोय टळू शकते तसेच ‘पार्क अ‍ॅपमुळे वाहनधारक डिजिटल पध्दतीने पार्किंग शुल्काचा भरणा करू शकतो. ज्यामुळे रोख रक्कम हाताळण्याची जोखीमही कमी होवू शकते. शिवाय उपक्रमाच्या आगारात वाहन असल्यामुळे सुरक्षिततेची जास्त हमी राहते, असे बेस्ट उपक्रमाने कळवले आहे.

वॅले पार्किंग या पध्दतीमध्ये वाहनधारक बस आगाराच्या प्रवेशद्वारावर वाहन सोडतील व तेथून सदर वाहन आगारात पार्क’ करण्याची व्यवस्था बेस्ट पार्क + च्या वतीने करण्यात येईल सुरुवातीला ही व्यवस्था कुलाबा, मुंबई सेंट्रल, / वरळी, दिंडोशी आणि वांद्रे या ५ बस आगारांमध्ये सुरु करण्यात येईल.

मुंबईकरांनी विशेषत: वाहनधारकांनी मुंबईतील जागेच्या समस्येमुळे आपले वाहन पार्किंग’ करण्याकरीता जागा मिळत नसल्याने होणारा मनःस्ताप टाळण्यासाठी पार्क या अ‍ॅपच्या माध्यमातून बेस्ट उपक्रमाच्या ‘वॅले पार्किंग’ आणि ‘स्वयं पार्किंग’ योजनेमध्ये आपल्या वाहनाकरीता आगाऊ जागा आरक्षित करावी आणि आपला अमूल्य वेळ वाचवावा असे आवाहन मुंबईतील वाहनधारकांना बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात येत आहे.

वॅले पध्दतीमध्ये शुल्क आकारणी

दोन तासांपर्यत
१०० रुपये- (कोणत्याही प्रकारच्या वाहनाकरीता)

दोन तासानंतर…
प्रत्येक तास अथवा त्याच्या भागाकरीता ३० रुपये अतिरिक्त

स्वयं पार्किंग सुविधा:

दुचाकी वाहने –

  • एक तासापर्यंत- २० रुपये
  • ३ तासापर्यंत- २५ रुपये
  • १२ तासापर्यंत-३०रुपये
  • १२ तासांपेक्षा जास्त :३५ रुपये
  • १२ तासांकरता मासिक पास:६६० रुपये

तीनचाकी/ चार चाकी / रिक्षा/ टॅक्सीवाहने –

  • एक तासापर्यंत- ३०रुपये
  • ३ तासापर्यंत-४० रुपये
  • १२ तासापर्यंत-७०रुपये
  • १२ तासांपेक्षा जास्त : ८०रुपये
  • १२ तासांकरता मासिक पास: १ हजार रुपये

ट्रक/ टेम्पो

  • एक तासापर्यंत- ५५ रुपये
  • ३ तासापर्यंत- ९०रुपये
  • १२ तासापर्यंत- १६५रुपये
  • १२ तासांपेक्षा जास्त :२०५रुपये
  • १२ तासांकरता मासिक पास: ३६३०रुपये

बस आणि स्कुल बस वाहने –

  • एक तासापर्यंत- ६०रुपये
  • ३ तासापर्यंत- ९५ रुपये
  • १२ तासापर्यंत-१७५रुपये
  • १२ तासांपेक्षा जास्त : २१५रुपये
  • १२ तासांकरता मासिक पास :२००० रुपये
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.