Pune : बालगंधर्व रंगमंदिरात येणाऱ्या प्रेक्षकांची पार्किंगची समस्या सुटणार

प्रेक्षकांना वाहने लावताना अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी महापालिकेने पार्किंगमध्ये बदल केल्याने चारचाकी व दुचाकी वाहने लावण्याची क्षमता काही प्रमाणात वाढली आहे.

150
प्रेक्षकांना वाहने लावताना अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी महापालिकेने पार्किंगमध्ये बदल केल्याने चारचाकी व दुचाकी वाहने लावण्याची क्षमता काही प्रमाणात वाढली आहे.
प्रेक्षकांना वाहने लावताना अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी महापालिकेने पार्किंगमध्ये बदल केल्याने चारचाकी व दुचाकी वाहने लावण्याची क्षमता काही प्रमाणात वाढली आहे.

पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात (Balgandharv Rangamandir) येणाऱ्या प्रेक्षकांची पार्किंगसाठी होणारी दमछाक आता थांबण्याची चिन्हे आहेत. कारण, महापालिकेने पार्किंगमध्ये (Parking) बदल केल्याने चारचाकी व दुचाकी वाहने लावण्याची क्षमता काही प्रमाणात वाढली आहे. त्याचबरोबर गाड्यांना बाहेर पडण्यासाठी वर्तुळाकार व्यवस्था केल्याने कोंडीची समस्याही सुटण्याची शक्यता आहे. (Pune )

बालगंधर्व रंगमंदिरामध्ये नाटक, विविध कार्यक्रम, प्रदर्शन पाहण्यासाठी दररोज येणाऱ्या हजारो प्रेक्षकांना वाहने लावताना अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा नाटक, कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी किंवा सुटल्यानंतरही रंगमंदिराच्या परिसरात वाहनांची कोंडी होते. मोठी कसरत करून वाहने बाहेर काढावी लागतात. रंगमंदिराच्या आवारातून अनेकदा बाहेर पडण्याच्या गेटमधूनच वाहने आतमध्ये प्रवेश करत असल्याने त्यावरूनही प्रेक्षक व सुरक्षारक्षकांमध्ये वाद होतात. (Pune)

जागेच्या अभावामुळे प्रेक्षकांवर अनेकदा वाहने मुख्य रस्त्यालगत लावावी लागतात. त्याबाबत प्रेक्षक, कलाकार, नाट्यव्यवस्थापकांनी महापालिकेच्या सांस्कृतिक विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेऊन पार्किंग व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार, पार्किंगमधील कामे पूर्ण केली आहेत.

असे बदल केले जातील

  • येथील कॅफेटेरिया बंद करून तेथेही वाहने लावण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
  • नाटक कंपन्यांच्या बस, कलाकारांच्या वाहनांच्या पार्किंगच्या ठिकाणी डांबरीकरण करून तेथे व्यवस्था करणे.
  • रंगमंदिराच्या पार्किंगमध्ये १०० दुचाकी व ९० मोटारी लावण्याची क्षमता आहे. या बदलांमुळे आणखी ५० दुचाकी आणि २५ गाड्यांची पार्किंग व्यवस्था होऊन यथील पार्किंगची समस्या सुटणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.