Parliament Security : संसद सुरक्षाभंग प्रकरण; केंद्राने घेतला मोठा निर्णय वाचा सविस्तर

संसद सुरक्षा भंग प्रकरणी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता संसद सुरक्षेची जबाबदारी CISF कडे देण्यात आली आहे. त्यामुळे गृह विभागाकडे आता संसदेची सुरक्षा असणार आहे.

240
Parliament Security : संसद सुरक्षाभंग प्रकरण; केंद्राने घेतला मोठा निर्णय वाचा सविस्तर
Parliament Security : संसद सुरक्षाभंग प्रकरण; केंद्राने घेतला मोठा निर्णय वाचा सविस्तर

काही दिवसांपूर्वी संसदेची सुरक्षा भंग झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आता संसद सुरक्षेची जबाबदारी आता CISF कडे देण्यात आली आहे. महत्वाच्या ठिकाणी ही यंत्रणा ठवण्यात येते. गृह विभागाच्या अखत्यारीत आता संसदेची सुरक्षा असणार आहे. यापुर्वी दिल्ली पोलिसांकडे संसदेची सुरक्षा होती. (Parliament Security )

संसदेच्या हिवाळी आधिवेशना दरम्यान बुधवार १३, डिसेंबर रोजी सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन तरुणांना लोकसभेतील प्रेक्षक गॅलरीतून थेट सभागृहात उडी मारली होती. संसदेवर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा २२ वा स्मृतीदिना दिवशी झालेल्या धक्कादायक प्रकाराने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी चव्हाट्यावर आल्याने देशभरात एकच खळबळ माजली आहे. सीआयएसएफ कडे सध्या अणू, दिल्ली मेट्रो, विमानतळ आणि एरोस्पेस संबंधित संस्थांसह अनेक इमारतींच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. (Parliament Security)

(हेही वाचा : Delhi Fire : कनॉट प्लेसमधील गोपालदास इमारतीला भीषण आग)

केंद्र सरकारने संसदेची सुरक्षा central Industrial security force(CISF) कडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. CISF ही केंद्रीय लष्कर दलाची एक विशेष तुकडी आहे. सीआयएसएफ सोबत संसद सुरक्षा सेवा, दिल्ली पोलीस आणि संसद कर्तव्य गट यांचाही सहभाग असेल. दरम्यान कर्नाटकातील अभियंता श्रीकृष्णा जगाली याला लोकसभेतील सुरक्षा त्रुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.

बुधवार २०  डिसेंबरच्या रात्री जगालीला दिल्ली पोलिसांनी बागलकोट येथून ताब्यात घेतले. त्याला दिल्लीत आणण्यात आले आहे. जगाली हा कर्नाटकच्या निवृत्त एसपीचा मुलगा असल्याचं म्हटलं जात आहे. तर, यूपीतील एका व्यक्तीलाही ताब्यात घेण्यात आले आहे, दोघांचीही चौकशी केली जात आहे.

श्रीकृष्ण जगाली हा डी.मनोरंजनचा मित्र असल्याचे सांगितले जाते. मनोरंजनने चौकशीदरम्यान श्रीकृष्ण जगालीचे नाव सांगितले होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगाली बागलकोटमधील त्याच्या घरातून काम करायचा. जगालीच्या बहिणीचे म्हणणे आहे की तिच्या भावाने काहीही चुकीचे केले नाही.त्याचवेळी, सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सागर शर्मा, डी मनोरंजन, अमोल शिंदे आणि नीलम या चार आरोपींची कोठडी गुरुवारी, २१  डिसेंबर रोजी संपत आहे. ललित झा आणि महेश कुमावत हे अन्य दोन आरोपीही कोठडीत आहेत. या सहा जणांची दिल्ली पोलिसांच्या पाच वेगवेगळ्या तुकड्यांकडून चौकशी सुरू आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.